Baramati Lok Sabha : अजित पवारांची आई नेमकी कुणाच्या घरी होती?
Ajit Pawar Mother : अजित पवारांच्या निर्णयामुळे आई कंटाळून बहिणीकडे राहायला निघून गेली, या श्रीनिवास पवार यांच्या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवारांनी आईसह केले मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

सुनेत्रा पवारांनी केले मतदान
Ajit Pawar Shrinivas Patil Baramati Lok Sabha Updates : एकीकडे दीर आणि दुसरीकडे मुलगा असल्याने आई पुण्याला बहिणीकडे निघून गेली, असे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले होते. श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विधानावर आता अजित पवारांनी उत्तर दिले. (Where was ajit pawar's mother?)
अजित पवारांनी बारामती येथे अजित पवार यांनी आई आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केले. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
आई तुमच्यासोबत नाहीये, असे श्रीनिवास पवार म्हणाले होते. त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, "असं कुणी सांगितलं? या आरोपात काही तथ्य नाही. कोल्हापूरच्या टोलवर चेक करा. माझी आई कोल्हापूरला नव्हती. माझ्या एका नातेवाईकाचे पुण्यात लग्न होतं. जगदाळे म्हणून माझ्या आत्या आहेत. त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी माझी आई पुण्यात होती. परंतू मी पुण्यात गेलो होतो, त्यावेळी ती म्हणाली की, अजित, मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे. तू मला येऊन मतदानाला घेऊन जायचं."
हेही वाचा >> 'अजितदादामुळे आई चक्क गाव सोडून पुण्याला..', श्रीनिवास पवारांनी मोठ्या भावाला सुनावलं!
"ती सहयोगला आलेली होती. सहयोगवरून मी आई आणि सुनेत्रा इथे आलो आहोत. आईचा मला आशीर्वाद आहे. आईचा मला पाठिंबा आहे. शेवटी ती माझी आई आहे. आमचा परिवार इतका मोठा आहे की, त्यामध्ये तीन फॅमिली आमच्याविरोधात होत्या. साहेबांची फॅमिली, श्रीनिवास पवारांची फॅमिली आणि राजेंद्र पवारांची फॅमिली. यांच्या व्यतिरिक्त कुणीही आमच्या विरोधात नव्हतं", असे ते म्हणाले.