Ajit Pawar :”कुणी गोळीबार करतंय, कुणी शिवीगाळ.. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?”
गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. तसंच सदा सरवणकर यांचं पिस्तुलही जप्त करण्यात आलं. तसंच काही आमदार वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आज या सगळ्याचा समाचार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला. कुणी शिवीगाळ करतंय, कुणी गोळीबार करतंय; ही […]
ADVERTISEMENT
गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. तसंच सदा सरवणकर यांचं पिस्तुलही जप्त करण्यात आलं. तसंच काही आमदार वादग्रस्त वक्तव्य करत असतात.
ADVERTISEMENT
आज या सगळ्याचा समाचार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला. कुणी शिवीगाळ करतंय, कुणी गोळीबार करतंय; ही संस्कृती आहे का आपल्या राज्याची? अशा कठोर शब्दात अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी ही टीका केली आहे.
एकनाथ शिंदेंचा निर्णय योग्य की अयोग्य हे जनताच ठरवेल-अजित पवार
हे वाचलं का?
नेमकं काय म्हणाले आहेत अजित पवार भाषणात?
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. सरकारकडे याचं उत्तर नाही. मात्र आज मी सरकारला सांगतो आहे की याचं उत्तर दिलं नाहीत तर सत्तेची मस्ती उतरवण्याची ताकद महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आहे. आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही. मात्र जे राजकारण सुरू आहे ते काय पद्धतीचं आहे सगळ्यांना कळतं आहे. शेतकऱ्यांना लगेच पैसे मिळतील सांगतिलं होतं दिले का पैसे? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
‘मला चुलत्याची (शरद पवार) सवय लागली, आता काय करू?’; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची ‘झोप’च काढली
ADVERTISEMENT
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?
गेल्या महिन्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईत गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदार गोळीबार करत असतील तर जनतेने कुणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्यांना शिक्षा केली पाहिजे. गोळीबार केला जातो, त्यांचे लोक शिवीगाळ करतात ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का?
ADVERTISEMENT
काही आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारांना सांगितलं विरोधकांचं हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाचं घर आहे का? तुम्ही हे कसं बोलू शकता? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.
काही आमदार म्हणतात गिन, गिन के चुन चुन के मारेंगे.. कोण कुणाला मारतंय? कोण कुणाला काय करतंय? बाकीच्यांनी बांगड्या भरल्या आहेत का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT