Sonali Phogat Death : ‘बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि हत्या’; रिंकू ढाकाचे गंभीर आरोप

मुंबई तक

टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूचं गूढ हळहळू उलगडताना दिसत आहे. या प्रकरणात नवी बाजू समोर आली आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाकाने गोवा पोलिसांत तक्रार दिलीये, ज्यात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून सोनाली फोगाटचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान आणि तिचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूचं गूढ हळहळू उलगडताना दिसत आहे. या प्रकरणात नवी बाजू समोर आली आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाकाने गोवा पोलिसांत तक्रार दिलीये, ज्यात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून सोनाली फोगाटचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान आणि तिचा मित्र सुखविंदर यांच्यावर करण्यात आले आहेत.

सोनाली फोगाटच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार सुधीर सांगवान आणि सुखविंदरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी सोनाली फोगाटला जेवणातून नशा येणारा पदार्थ मिसळवून जेवण दिलं गेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या कृत्याचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर तिला सातत्यानं ब्लॅकमेल केलं जात होतं. सोनाली फोगाटच्या भावाने केलेल्या या दाव्याने या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय. आता या अंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय.

सोनाली फोगाटच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा, पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर

सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसांत दिलेली तक्रार तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. यात सोनाली फोगाटचा मृत्यू कसा झाला? सोनाली फोगाटची हत्या झालीये का आणि सोनाली फोगाटला अश्वील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केलं गेलंय का?

हे वाचलं का?

    follow whatsapp