Sonia Gandhi यांना कोरोना पाठोपाठ फंगल इनफेक्शन, डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठ आता त्यांना फंगल इनफेक्शनही झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. १२ जूनला सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्त येऊ लागलं होतं. त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनिया गांधी या सध्या याच […]
ADVERTISEMENT

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठ आता त्यांना फंगल इनफेक्शनही झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. १२ जूनला सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्त येऊ लागलं होतं. त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनिया गांधी या सध्या याच रूग्णालयात उपचार घेत आहेत.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे का लागली ED? National Herald Case
सर गंगाराम रूग्णालयातील डॉक्टर सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. तसंच त्यांच्यावर योग्य ते उपचारही करत आहेत. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती. तसंच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली. आता सोनिया गांधी यांना फंगल इनफेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.
A statement on Congress President’s health condition. pic.twitter.com/4tVBtgyhEi
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 17, 2022
सोनिया गांधी यांना फंगल इनफेक्शन झाल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. २ जूनला त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. या पाठोपाठ आता त्यांना फंगल इनफेक्शनचा त्रास सुरू झाला आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी या दोघांनाही ED ने नोटीस बजावली होती.









