दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने कामगार चळवळीचं इतिहास पर्व संपलं
गिरणी कामगारांच्या संघर्षातील बिन्नीचे नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने कामगार चळवळीच्या इतिहासाचं एक पर्व संपलं आहे. गिरणी कामगार हा मुंबईचा मानबिंदू. या कामगार चळवळीला मोठा इतिहास आहे. सामाजिक राजकीय, सांस्कृतिक किंवा साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात गिरणी कामगारांच्या संघर्षाचा आजही प्रभाव आहे. अनेक दिग्गजांनी या चळवळीचं नेतृत्व केलंय. मात्र कामगार ते कामगार नेता हा इस्वलकरांचा प्रवास […]
ADVERTISEMENT

गिरणी कामगारांच्या संघर्षातील बिन्नीचे नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने कामगार चळवळीच्या इतिहासाचं एक पर्व संपलं आहे.
गिरणी कामगार हा मुंबईचा मानबिंदू. या कामगार चळवळीला मोठा इतिहास आहे. सामाजिक राजकीय, सांस्कृतिक किंवा साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात गिरणी कामगारांच्या संघर्षाचा आजही प्रभाव आहे. अनेक दिग्गजांनी या चळवळीचं नेतृत्व केलंय. मात्र कामगार ते कामगार नेता हा इस्वलकरांचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या पटकथेला शोभावा असाच आहे.
ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांचा व्यापक संप डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला. या संपाने मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र ढवळून निघाला. मुंबईचा तर नक्शाच बदलून गेला. या संपाने शेकडो कुटुंबांची वाताहत झाली. मुजोर गिरणी मालक, सरकारची निष्क्रियता यात गिरणी कामगार भरडला गेला.











