अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा
– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. लता दीदींनी आपल्या समधुर गाण्यांमधून देशासह जगभरात आपले कोट्यवधी चाहते निर्माण केले. आपल्या भावंडांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या लतादीदी धार्मिक वृत्तीच्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं खास नातं होतं. अक्कलकोट येथील श्री स्वामी […]
ADVERTISEMENT
– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. लता दीदींनी आपल्या समधुर गाण्यांमधून देशासह जगभरात आपले कोट्यवधी चाहते निर्माण केले. आपल्या भावंडांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या लतादीदी धार्मिक वृत्तीच्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं खास नातं होतं.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्याशी लतादीदींचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. लतादीदींनी आपल्या ताफ्यातल्या दोन अलिशान गाड्या अन्नछत्राला सेवेसाठी दिल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या मर्सिडीज् बेंझ-कॉम्प्रेसर सी 200 (एमएच 01 एनए 4221) व शेव्हरलेट-क्रुझ (एमएच 01 एएक्स 8584) अशा दोन आलिशान गाड्यांच्या किल्ल्या आणि कागदपत्रे भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हा कार्यक्रम मंगेशकर यांच्या “प्रभुकुंज’ या निवासस्थानी पार पडला होता.
हे वाचलं का?
लतादीदींकडे आहे कार्सचं खास कलेक्शन, जाणून घ्या आपल्यामागे किती संपत्ती सोडून गेल्या दीदी?
यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई खडीकर आदी मंगेशकर परिवार आणि जन्मेजयराजे भोसले यांचे कुटुंबीय उपस्थित होते.मीनाताई खडीकरलिखित “मोठी तिची सावली’ या पुस्तकात जन्मेजयराजे भोसले यांचा उल्लेख घरातील माणसे असे करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत
ADVERTISEMENT
अन्नछत्रात पोळ्या लाटून केली होती सेवा –
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे अक्कलकोटमधील शिवस्मारक कारंजा, खुली व बंदिस्त व्यायामशाळा, प्रशस्त वाहनतळ, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, यात्री निवास अशा अनेक प्रकल्पांच्या निर्मितीबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे. लता मंगेशकर यांनी अन्नछात्र मंडळातील अन्नपूर्णा गृहात स्वत: पोळ्या लाटून सेवा बजावली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमेला हृदयनाथ मंगेशकर व उषा मंगेशकर सांस्कृतिक सेवा बजावित आहेत.
३६ भाषांमध्ये हजारो गाणी…तरीही लतादीदींचं पहिलं गाण झालं नव्हतं रिलीज, जाणून घ्या कारण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT