ऐन दिवाळीत प्रवासाचे होणार हाल?; एसटी कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं शस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर जाणार आहे असून, तसा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

आर्थिक घडी विस्कटलेल्या एसटी महामंडळाची परिस्थिती गेल्या गेल्या दोन वर्षांच्या काळात आणखी खालावली असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासह विविध मुद्दे ऐरणीवर आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगारांच्या संघटनांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. संप कधीपासून पुकारणार याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.

तातडीने हस्तक्षेप करा; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

हे वाचलं का?

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध 17 कामगार संघटनांच्या कृती समितीची बैठक पार पडली. कामगार भवन येथे झालेल्या बैठकी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची दिवाळी हर्षोल्हास साजरी करता येणार असल्यानं सगळीकडे लगबग सुरू आहे. मात्र ऐन दिवाळी तोंडावर आलेली असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

कर्जाचं ओझं! एसटीचालकाने बसमध्येच घेतला गळफास; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर पत्र व्हायरल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ‘प्रशासनाने ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन देण्याचा शासन निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यातील १ लाख कर्मचारी १ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करतील, याची नोंद घ्यावी. या काळात प्रवाशांच्या गैरसोयीला महाराष्ट्र सरकार आणि एसटी प्रशासन जबाबदार असेल’, अशा आशयाचे पत्र सोशल मीडियावर फिरत असून, या पत्राला कोणत्याही एसटी कामगार संघटनेनं दुजोरा दिलेला नाही.

बीड : आर्थिक विवंचनेतून एसटी बस चालकाची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

कोरोना आणि लॉकडाउनचा महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला प्रचंड फटका बसला. एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली असून, कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात आली. मात्र, या काळात एसटी कर्मचारी तणावाखाली गेल्याचं दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, दिवसेंदिवस त्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT