एकही लढाई न हरलेल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांची गोष्ट
285 वर्षापुर्वी मराठयांच्या इतिहासात एक अभूतपुर्व घटना घडली आणि य़ाच घटनेला 29 मार्चला 285 वर्ष पूर्ण झाली आहेत. या घटनेचा नायक होता बाजीराव पेशवा. 1720 ला वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी बाजीराव पेशव्याने वस्त्रं स्वीकारली आणि काही वर्षातच मराठी घोडी ही माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, ग्वालीयर भागात धुमाकूळ घालू लागली. 1736 पर्यंत राजपुताना, माळवा या भागात […]
ADVERTISEMENT

285 वर्षापुर्वी मराठयांच्या इतिहासात एक अभूतपुर्व घटना घडली आणि य़ाच घटनेला 29 मार्चला 285 वर्ष पूर्ण झाली आहेत. या घटनेचा नायक होता बाजीराव पेशवा. 1720 ला वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी बाजीराव पेशव्याने वस्त्रं स्वीकारली आणि काही वर्षातच मराठी घोडी ही माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, ग्वालीयर भागात धुमाकूळ घालू लागली. 1736 पर्यंत राजपुताना, माळवा या भागात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाला होता. बाजीरावांचा शब्द हा देशाच्या राजकारणात प्रमाण मानला जात होता. दक्षिणेला इंग्रज, पोर्तुगीज, निजाम हे सगळे बाजीरावांच्या शब्दाबाहेर नव्हते होते.
अपवाद होता फक्त दिल्लीचा, दिल्लीकरांचा समाज होता की महाराष्ट्र आणि बाजीराव हे अजून लांब आहेत. पण दिल्लीश्वरांचा हा समाज मराठ्यांनी कसा चुकीचा ठरवला याचीच गोष्ट जाणून घेणार आहोत.
1737 च्या सुमारास मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे , विठोजी घुले हे सगळे सरदार हे उत्तरेत होते. यमुनेच्या दक्षिणेला या सगळ्या सरदारांसोबत बाजीराव ठाण मांडून बसले होते. 1736 च्या दसर्याच्या मुहुर्तावर बाजीराव हे सीमोल्लंघनासाठी बाहेर पडले होते. मजल दरमजल करत यमुनेजवळ असलेला जाटांच्या ताब्यातला आटेरचा किल्ला ताब्यात घेऊन होळकर आणि शिंदे हे दुआबात शिरले,.
या भागात लूट करुन परतत असताना होळकर आणि शिंदेंना मुघल सरदार सादत खान आणि त्याचा जावई सफदरजंग यांचा सामना करावा लागला. या दोन सरदारांच्या पुढे मल्हारराव निभाव लागला नाही पण मराठ्यांचे फारसे नुकसानही झाले नाही पण सादात खान आणि सफदरजंग यांनी ही बातमी तिखट मीठ लावून मुघल बादशहाकडे पोचवली.