J-K Terror Attack : मोदींच्या कश्मीर दौऱ्याआधी दहशतवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली जात असतानाच जम्मू कश्मिरातील संजुवानमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या एका बसवर हल्ला केला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दहशतवादी हल्ला आणि चकमकीत एकूण ९ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कश्मिरातील […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली जात असतानाच जम्मू कश्मिरातील संजुवानमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या एका बसवर हल्ला केला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दहशतवादी हल्ला आणि चकमकीत एकूण ९ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कश्मिरातील सांबा जिल्ह्यात पंतप्रधान मोदी जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत दिवशी पंतप्रधान मोदी पाली गावात जाणार आहेत असून, त्याआधीच कश्मिरात दहशतवाद्यांनी जवानांच्या बसला लक्ष्य बनवलं.
संजुवानमध्ये चढ्ढा कॅम्पजवळ सकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या जवानांच्या बसवर हल्ला केला. या बसमधून १५ जवान ड्युटीवर निघाले होते, त्याच वेळी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
हे वाचलं का?
या हल्ल्यानंतर सीआयएसएफने तत्काळ प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत एक लष्करातील अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ९ जवान जखमी झाले आहेत.
या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने परिसरात शोध मोहीम हाती घेतली. संजुवान परिसरात सुरक्षा जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या धुमश्चक्रीत पाच जवान जखमी झाले. रात्रीपासून सुरक्षा जवानांनी परिसराला वेढा दिला आहे.
ADVERTISEMENT
‘दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सध्या चकमक सुरूच आहे. दहशतवादी घरात असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मुकेश सिंह यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
#UPDATE | 1 security force jawan martyred and 4 jawans injured in the encounter. We had cordoned off the area in the night. Encounter still underway (in Sunjwan area of Jammu). Terrorists seem to have hidden in a house: Mukesh Singh, ADGP Jammu Zone pic.twitter.com/sHN7isoyDL
— ANI (@ANI) April 22, 2022
कलम 370 हटवल्यानंतर मोदींचा पहिलाच दौरा
जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आणि तीन केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू आणि कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दौरा केला, मात्र ते सीमेवरच गेले होते. २०१९ मध्ये राजौरी येथे त्यांनी दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये २०२१ नौशेरा सेक्टरमध्ये गेले होते.
दरम्यान, मागील काही तासांत लष्कराने दहशतवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. मागील काही तासांत झालेल्या दोन चकमकींमध्ये पोलिसांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT