आता अमेरिकेत झळकलीय शेतकरी आंदोलनाची जाहिरात
पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबादर्शवल्यानंतर आता परदेशातल्या अनेक सेलिब्रिटिज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. अमेरिकेतल्या सिटी ऑफ फ्रेस्नोच्या मेयरनेही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची सर्वात मोठी फुटबॉल लीग मानल्या जाणा-या ‘सुपर बाउल फुटबॉल लीग’मध्ये भारतातल्या शेतकरी आंदोलनाची जाहिरात झळकलीय. सुपर बाउल फुटबॉल लीगही अमेरिकेतली सर्वात मोठी नॅशनल […]
ADVERTISEMENT

पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबादर्शवल्यानंतर आता परदेशातल्या अनेक सेलिब्रिटिज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. अमेरिकेतल्या सिटी ऑफ फ्रेस्नोच्या मेयरनेही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची सर्वात मोठी फुटबॉल लीग मानल्या जाणा-या ‘सुपर बाउल फुटबॉल लीग’मध्ये भारतातल्या शेतकरी आंदोलनाची जाहिरात झळकलीय.
सुपर बाउल फुटबॉल लीगही अमेरिकेतली सर्वात मोठी नॅशनल फुटबॉल लीग आहे. 60 च्या दशकात ती ‘सुपर बाउल’ या नावाने ओळखली जाऊ लागली. सुपर बाउलचा प्लॅटफॉर्म जाहिरातींसाठी महत्त्वाचा मानला जातो कारण तिथे दरवर्षी जगातल्या काही सर्वात प्रसिद्ध जाहिराती लॉन्च केल्या जातात. मात्र या वर्षी तिथे इतर काही जाहिरातींबरोबरच भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची जाहिरातही दाखवली गेली. ‘मानवी इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन’, असा उल्लेख या आंदोलनाचा या जाहिरातीत करण्यात आला आहे.
World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood pic.twitter.com/583H2l3hax
— Jazzy B (@jazzyb) February 7, 2021
टम्पा बे बुकेनेर्स आणि कंसास सिटी चीफ्स यांच्यातला सामना सुरू असताना ही 30 सेकंदाची जाहिरात चालली. जाहिरातीची सुरूवात मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरच्या एका क्वोटने होते आणि भारतात सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हे, ‘मानवी इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन’ असल्याचा उल्लेख त्यात येतो.
अमेरिकेत या सुपर बाउलमध्ये झळकणा-या जाहिरातींना वेगळं महत्त्व आहे कारण त्या बरेचदा स्पेशली सुपर बाउलमध्ये दाखवण्यासाठी तयार केल्या जातात. त्यात वापरलेलं कॅमेरा तंत्र, सिनेमॅटोग्राफी सगळ्याच बाबतीत त्या खूप उजव्या असतात असं मानलं जातं. आता राउटर्सच्या रिपोर्टनुसार टम्पा बे बुकेनेर्स आणि कंसास सिटी चीफ्स यांच्यातल्या ज्या सामन्यात ही जाहिरात झळकली तो सामना 10 कोटी लोकांनी पाहिला असल्याचा अंदाज आहे.