‘ते तिसरे अस्त्र काढतील’, विभक्त पतीच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेतल्या बंडाळीनंतर याचे हादरे शिवसेनेतल्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचताना दिसत आहे. घरांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झालेत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात सामील झालेल्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या घरापर्यंत हे पोहोचलंय. सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात गेल्यानंतर वाघमारेंनी सुषमा अंधारेंबद्दल गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर […]
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या बंडाळीनंतर याचे हादरे शिवसेनेतल्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचताना दिसत आहे. घरांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झालेत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात सामील झालेल्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या घरापर्यंत हे पोहोचलंय. सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात गेल्यानंतर वाघमारेंनी सुषमा अंधारेंबद्दल गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनी फोटो शेअर करत लेकीसाठी पोस्ट लिहिलीये.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारेंनी त्यांच्या लेकीसाठी लिहिलेली फेसबुक पोस्ट…
सुषमा अंधारे म्हणतात, “प्रिय कब्बु, तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता, पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं. विशाल मामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारीसारखी तुझ्याकडे झेपावले.”
पुढे पोस्ट मध्ये सुषमा अंधारेंनी म्हटलंय, “बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेनं जायचं नाकारलं आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय! तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही, पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात.”
हे वाचलं का?
Sushma Andhare यांच्या विभक्त पतीचा ‘शिंदे गटात’ प्रवेश : 4 दिवसात करणार मोठा गौप्यस्फोट
“बाबासाहेब लिहितात, ‘जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील!”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी ‘भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत, यांच्यापासून सावध राहा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे विधानही शेअर केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सुषमा अंधारेंचे पती वैजनाथ वाघमारेंनी काय दिलाय इशारा?
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर वैजनाथ वाघमारे म्हणाले होते की, “सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये, असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या आणि त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे आणि माझे विचार वेगळे”, असं वैजनाथ वाघमारे म्हणाले होते.
शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून ‘प्रमोशन’; कोण आहेत सुषमा अंधारे?
पुढे बोलताना वैजनाथ वाघमारे असंही म्हणाले होते की, “सुषमा अंधारे यांनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीनं त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय आहे? कोठून आल्या? काय झालं? कोणी आणलं? हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे”, असं म्हणत वाघमारेंनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT