अभिनेत्री सुश्मिता सेनचा चाहत्यांना धक्का! ललित मोदींसोबत थाटणार संसार

मुंबई तक

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे दोघंही लग्न करणार आहेत. याची घोषणा ट्विटर करण्यात आली आहे. सुश्मिता सेनचं मागच्या वर्षी ब्रेक अप झालं होतं. त्यानंतर सुश्मिता सेन ललित मोदींना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशात आता त्यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेचे पत्रकार शिव अरूर यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. सुरूवातीला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे दोघंही लग्न करणार आहेत. याची घोषणा ट्विटर करण्यात आली आहे. सुश्मिता सेनचं मागच्या वर्षी ब्रेक अप झालं होतं. त्यानंतर सुश्मिता सेन ललित मोदींना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशात आता त्यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेचे पत्रकार शिव अरूर यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. सुरूवातीला या दोघांनी विवाहाची बातमी समोर आली होती. मात्र सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत हे ललित मोदी यांनी म्हटलं आहे.

ललित मोदी यांनीही ही घोषणा केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचे आणि सुश्मिता सेनचे फोटोही ट्विट केले आहेत. सुश्मिता सेनचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच रंगल्या होत्या. अशात आता तिने तिच्या चाहत्यांना धक्का देत ललित मोदी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

आयपीएलचे फाऊंडर ललित मोदी हे विवाहबंधनात अडकणार आहेत. ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्यात प्रेमाचा अध्याय सुरू झाला आहे. ललित मोदींनी सुश्मिता सोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. सुश्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत आहोत असं नंतर त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp