Sushmita Sen: प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनला आलेला हृदयविकाराचा झटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sushmita Sen Suffers Heart Attack : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) हृदयविकाराचा झटका (Heart Attack)आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिची तब्येत इतकी खालावली होती की, तिला अँजिओप्लास्टी (Angioplasty Surgery)करावी लागली होती. या घटनेची माहिती स्वत: सुश्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. ही घटना ऐकूण चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच चाहते तिच्या या पोस्टवर तब्येतीची विचारपूस करत आहेत. (sushmita sen heart attack a couple of days back angioplasty done stent in place share post to inform fans)

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपुर्वीच सुष्मिता सेनला (Sushmita Sen) हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनेत तिची तब्येत इतकी खालावली होती की तिला अँजिओप्लास्टी सर्जरी (Angioplasty Surgery)करावी लागली होती. ही सर्जरी आता व्यवस्थित पार पडली असून तिची प्रकृती ठिक आहे. या धक्कादायक घटनेची माहीती तिने सोशल मीडियावर दिली आहे.

Adani Group ला ‘सर्वोच्च’ झटका; सुप्रीम कोर्ट
करणार हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी

हे वाचलं का?

पोस्टमध्ये काय?

सुष्मिता सेनने (Sushmita Sen) वडिल सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहते की, तुमच्या हृदयाला मजबूत आणि आनंदी ठेवा, ते तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभे राहील. ज्यावेळेस तुम्हाला त्याची सर्वांत जास्त गरज असेल. ही ओळ माझ्या वडिलांनी सांगितली होती, असे सुश्मिता सेन तिच्या पोस्टमध्ये म्हणते.

सुष्मिता सेनने (Sushmita Sen) पुढे तिच्या तब्येती बाबतची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी माझी तब्येत इतकी खालावली होती की अँजिओप्लास्टी करावी लागली होती. आता माझी प्रकृती ठिक आहे. तसेच माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी पुष्टी केली आहे की माझे हृदय खरोखर मोठे आहे, अशी माहिती तिने दिले. असे बरेच लोक आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. त्यांच्यामुळे मला वेळेवर उपचार मिळू शकले. त्याच्या तत्परतेमुळे मी सावरले. याबाबतची माहिती मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन.

ADVERTISEMENT

Chinchwad by-election Result : अश्विनी जगतापांनी चिंचवड जिंकलं; कलाटेंमुळे ‘मविआ’चा गेम?

ADVERTISEMENT

सुश्मिता सेनने (Sushmita Sen) ही पोस्ट तिच्या चाहत्यांना माहिती देण्यासाठी केली असल्याचे शेवटी ती म्हणतेय. मी माझे आयुष्य मुक्तपणे जगण्यास तयार आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते, असे ती चाहत्यांसाठी म्हणतेय. सुश्मिताच्या या पोस्टवर लाईक कमेंटचा पाऊस पडतोय. अनेक चाहत्यांनी तिची प्रकृती ठिक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

दरम्यान सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाले तर, ती आर्या 2 चे शूटिंग करत आहे. अलिकडेच तिचा फर्स्ट लुकही शेअर केला होता. हा तिचा लुक चाहत्यांना आवडला होता. तसेच आता चाहत्यांना तिच्या आर्या 2 सीरीजची उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT