धक्कादायक! राजापूरमध्ये निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, एसटी कर्मचारी आक्रमक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

ADVERTISEMENT

राजापूर आगारातील आंदोलन करणाऱ्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एस.टी.महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. या संपामध्ये सहभागी झाल्याबद्दल निलंबित करण्यात आलेला राजापूरमधील एस.टी. कर्मचारी राकेश रमेश बांते (वय 35) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री 10.30 वा. च्या सुमारास घडली. राजापूर आगारामध्ये ते चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत होते. 

राकेश बांते यांच्या मृत्यूनंतर एसटी कर्मचारी आणि त्यांची बांते यांची पत्नी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी आगार प्रमुखांच्या विरोधात सदोष मन्युष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राकेश यांच्या पत्नी भाग्यश्री बांते यांनी केली आहे. तर बांते यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.  राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

या महिन्याच्या सुरूवातीला संपात सहभागी झालेल्या राकेश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. बुधवारी काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने राजापूरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री 10.30 वा. च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राकेश बांते यांच्या मृत्यूने बांते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान माझ्या पतीच्या मृत्युस राजापूर आगार व्यवस्थापकच जबाबदार असून, राजापूर आगार व्यवस्थापक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल यावा अशी मागणी भाग्यश्री बांते यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, माझे पती राकेश रमेश बातें चालक तथा वाहक रा.प. राजापूर आगार येथे कार्यरत असून ते संपूर्ण महाराष्ट्रात चालु असलेल्या कर्मचाऱ्यांचे दुखवटयात सामील होते. यामुळे त्याचेवर आगार व्यवस्थापक राजापूर यांनी निलंबनाची कारवाई केलेली होती. तेव्हापासून ते मानसिक दडपणाखाली होते . त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्युस राजापूर आगार व्यवस्थापक हेच जबाबदार असून त्यांचेवर गुन्हा दाखल करून योती कारवाई व्हावी अशी मागणी पत्नीने केली आहे.

राकेश रमेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असून गेली सुमारे चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते राजापूरात राहत होते. त्यांच्या झालेल्या या आकस्मिक निधनाबद्दल एस.टी. कर्मचार्‍यांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT