अमरावतीत महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा कुटुंबीयांनी केला आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

ADVERTISEMENT

अमरावतीत एका महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत डॉक्टरच्या आई वडिलांनी या प्रकरणी महिलेच्या डॉक्टर पतीवर घातपाताचा आरोप केला आहे. या महिला डॉक्टरचा मृत्यू कोणतंतरी इंजेक्शन घेऊन झाल्याची माहिती समोर येते आहे. आता ही आत्महत्या आहे की हत्या ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

अंबाजोगाईमध्ये पुजाऱ्याचा भरदिवसा चाकूने भोसकून खून, धक्कादायक घटनेने खळबळ

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

अमरावती शहरातील राधानगर भागात असलेल्या साई हेल्थ अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश दिवाण यांच्या पत्नीचा मृतदेह राहत्या घरात आढळला. प्रथमदर्शनी डॉक्टर महिलांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला कुठलेसे इंजेक्शन टोचून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे प्रकरण घडल्यानंतर डॉ. प्रकाश दिवाण यांनीच आमच्या मुलीला संपवलं असा आरोप मृत डॉक्टर प्रियंकाच्या आई वडिलांनी केला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यात निवृत्त कर्नलने गोळी झाडून केली पत्नीची हत्या, स्वत:लाही संपवलं

ADVERTISEMENT

डॉ. प्रियंका दिवाण असं मृत डॉक्टरचं नाव आहे. डॉ. प्रियंका यांचं शरीर काळंनिळं पडलं होतं. या प्रकरणी सध्या तरी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रियंका यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. अकोला मेडिकल कॉलेजमध्ये या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं जाणार आहे. आता पोलीस या संबंधीचा अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

अमरावतीतल्या राधानगरी मध्ये डॉ. प्रियंका या त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. सकाळ झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा बेडरूम उघडण्यात आलं तेव्हा डॉ. प्रियंका यांचा मृतदेह चादरीवर पडला होता.

डॉ. प्रियंका या डॉ. पंकज दिवाण यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रियंका यांना मूल होत नव्हतं त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये होत्या. त्या अँटी डिप्रेशनच्या गोळ्याही घेत होत्या. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांना वाटते आहे. मात्र डॉ. प्रियंका यांच्या आई वडिलांनी या प्रकरणी डॉ. पंकज यांच्यावर घातपाताचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT