Taliban-Afghanistan War : अफगाणिस्तानात होणार सत्तांतर?, काबूलला वेढा पडताच घडामोडींना वेग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन सैन्यानं परतीचे रस्ते धरताच बळ वाढलेल्या तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानात अक्षरशः हैदोस घातला आहे. एक एक प्रांत ताब्यात घेत तालिबानी बंडखोरांनी राजधानी काबूलमध्ये धडक दिली आहे. काबूलला तालिबान्यांचा वेढा पडल्यानंतर आता सत्तांतराच्या चर्चेच्या दिशेनं घडामोडी घडत आहे. तालिबान्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रापती भवनाकडे निघालं असल्याची माहिती एपी वृत्त संस्थेनं दिली आहे.

शनिवारपर्यंत (१४ ऑगस्ट) राजधानी काबूलच्या सीमेपर्यंत पोहोचलेल्या तालिबानी बंडखोरांनी काबूलला चोहीबाजूंनी वेढा दिला आहे. आता काबूल शहरातही तालिबानी बंडखोर घुसले असून, ताकदीच्या बळावर काबूलवर कब्जा करणार नसल्याचं तालिबाननं म्हटलं आहे.

तालिबानी बंडखोर काबूलमध्ये शिरल्याचं वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं अफगाणिस्तानी उच्च अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. तालिबानी बंडखोर काबूलमधील कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात पोहोचले आहेत. त्यामुळे अफगाण सरकारची चिंता वाढली आहे. बंडखोर काबूलमध्ये घुसल्याचं वृत्त समोर आल्यानंतर तालिबानकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘ताकदीच्या जोरावरआपण काबूलवर कब्जा मिळवण्याचा आपला विचार नाही. सर्व काही सत्तांतरातून सूत्रे हस्तांतरित केली जावीत. सत्तांतर शांततेत झाल्यास कोणतीही जीवित वा आर्थिक हानी केली जाणार नाही’, असं तालिबाननं म्हटलं आहे.

बंडखोर काबूलमध्ये घुसले असल्याचं माहिती समोर आली असली, तरी तालिबाननं मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘आपल्याला जवानांना काबूलमध्ये शिरण्यास मज्जाव केलेला आहे आणि सीमेवर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आलेलं आहे. सर्वसामान्य नागरिक आणि सैन्यातील जवानांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले केले जाणार नाहीत’, असं तालिबाननं म्हटलं आहे. बंडखोरांनी काबूलला वेढा दिल्यानंतर आता अफगाणिस्तानात सत्तांतरांच्या दिशेनं घडोमोडी घडताना दिसत आहे. एपी वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेल्या माहिती प्रमाणे तालिबान्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्तांतराच्या चर्चेसाठी रवाना झालं आहे.

ADVERTISEMENT

अफगाणिस्तान सरकार काय म्हणाले?

ADVERTISEMENT

तालिबानी बंडखोर हळूहळू काबूलमध्ये शिरकाव करत आहेत. सर्व बाजूंनी बंडखोर असून, बंडखोर काबूलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं अफगाण सरकारनं म्हटलं आहे. विमानतळाकडे जाणारा रस्ता वगळता सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. काबूलपर्यंत पोहोचण्यापूर्वी तालिबाननं अफगाणिस्तानातील अनेक प्रांत आणि महत्त्वाची शहरं ताब्यात घेतली. शनिवारी तालिबाननं जलालाबादवरही कब्जा मिळवला आहे.

अफगाणिस्तानचे प्रभारी गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जाकवाल यांनीही काबूलमधील परिस्थितीची माहिती दिली. ‘काबूलवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही. सत्तांतर शांततापूर्ण मार्गाने होईल. सुरक्षा दलं काबूलची सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT