…अन् ताम्हीणी घाटही शहारला! वाशिमच्या 6 तरुणांसोबत घाटात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकणात वर्षा पर्यटनासाठी निघालेल्या सहा तरुणांसोबत घडलेल्या घटनेनं प्रसंगाने ताम्हीणी घाटही शहारला असेल! वाशिम जिल्ह्यातील सहा तरुणांसोबत ताम्हीणी घाटात भयंकर दुर्घटना घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. मृत आणि जखमींना शनिवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्री बाहेर काढण्यात आलं.

ADVERTISEMENT

ऋषभ किशोर चव्हाण (वय 24), कृष्णा पंडित राठोड (वय 27), सौरभ श्रीकांत भिंगे (वय 25), रोहन परशुराम गाडे (वय 26), प्रवीण गजानन सरकटे (वय 26) रोहन किशोर चव्हाण (वय 22) (सर्व रा. मंगळूरपीर, जि. वाशिम) हे सर्व मित्र कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. स्विफ्ट गाडीने (क्र MH 12 HZ 5535) देवकुंड येथे येत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यात तिघे जागेवर गतप्राण झाले.

हे वाचलं का?

वाशिमच्या तरुणांसोबत ताम्हीणी घाटात काय घडलं?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना घडलेल्या दुर्घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सहा तरुण कारमधून पुण्यावरून देवकुंडच्या दिशेने निघाले होते. शनिवारी दुपारी ४.३० वाजता कोंडेथर-सणसवाडी गावाच्या हद्दीतील दरीत त्यांचा अपघात झाला.

गाडीत समोर दोघे, तर मागे चौघे जण बसले होते. ताम्हीणी घाटातून जात होते. डोंगराच्या काठावर जाऊन फोटो काढण्यासाठी ते कार त्या दिशेनं घेऊन जात होते. टोक जवळ येत असतानाच निसरडा रस्ता आणि चिखलामुळे कारची चाकं घसरू लागली आणि कारवरील नियंत्रण गेलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ताम्हीणी घाट अपघतात : जीव वाचवण्यासाठी टाकल्या उड्या

कार दरीच्या दिशेनं जाऊ लागल्यानं मागे बसलेल्या चौघांनी दरवाजे उघडले. त्याच दरम्यान कार ७०० फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, कार खाली जात असतानाच मागे बसलेल्या चौघांनी बाहेर उड्या मारल्या. पण तेही डोंगरावरून घसरून दरीत कोसळले. खाली कोसळतानाच ते दगडावर आदळून झाडांमध्ये अडकले.

तर जे दोन तरुण गाडीत समोर बसले होते. ते कारबरोबर दरीत कोसळले. कार खाली दरीतून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पडली आणि मोठ्या दगडात अडकली. रस्त्याकडेला दुर्घटनाग्रस्त कार बघून लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर दरीत अडकलेल्या एका तरुणाने झाडाची फांदी हलवून मदत मागितली. त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मदत पथकांना पाचारण करण्यात आलं. तीन बचाव पथकांनी सहा तरुणांना मध्यरात्री दीडपर्यंत बाहेर काढलं.

तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

या घटनेत ऋषभ किशोर चव्हाण, कृष्णा पंडित राठोड, सौरभ श्रीकांत भिंगे या तीन तरुणांचा जागेवरच मृ्त्यू झाला. तर रोहन परशुराम गाडे (ड्रायव्हर), प्रवीण गजानन सरकटे, रोहन किशोर चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT