यासाठीच मोदी-शाहांनी ईडीचा वापर करून कळसुत्री बाहुल्यांचं सरकार आणलं -नाना पटोले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही संबोधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाटा एअरबस प्रोजेक्टवरून टीका केलीये. केंद्रातलं मोदी सरकार मुंबई, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातलं सरकार एक दिवस मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते.

ADVERTISEMENT

टाटा एअरबस प्रोजेक्टवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं. “महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचं. या ध्येयानं केंद्रातलं मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे.”

“राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकेल. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हे वाचलं का?

“महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचं शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

“दुर्दैवानं यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्तावित मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले”, असा आरोप नाना पटोलेंनी केली.

ADVERTISEMENT

नाना पटोले : “मोदी-शाहांनी ईडीचा वापर करून सरकार आणलं”

“महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ED चा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रोजेक्टही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला”, असं म्हणत नाना पटोलेंनी प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलंय.

ADVERTISEMENT

“राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे”, असा टोला नाना पटोलेंनी उदय सामंत यांना लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT