शिक्षकी पेशाला काळीमा ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
जागतिक महिला दिनाला आज संपूर्ण देशभरात स्त्रीशक्तीचा जागर होतो आहे. परंतू आजच्याच दिवशी नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचं कळतंय. पीडित मुलीने या घटनेविषयी आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यावरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला POCSO कायद्याअंतर्गत अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT
जागतिक महिला दिनाला आज संपूर्ण देशभरात स्त्रीशक्तीचा जागर होतो आहे. परंतू आजच्याच दिवशी नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पीडित मुलीने या घटनेविषयी आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यावरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला POCSO कायद्याअंतर्गत अटक केली आहे.
प्रेयसीच्या नातेवाईकावर रोखली बंदूक, हवेत गोळीबार करत तरुणीला नेलं पळवून
हे वाचलं का?
सतीश नरंगले असं या आरोपीचं नाव असून तो यश नगर भागात आयडीयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅथ्स या नावाने क्लास चालवतो. या क्लासमध्ये अनेक विद्यार्थी शिकायला येतात. सोमवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास आरोपी सतीश नरंगलेने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
मुंबई : तीन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याची रेल्वेसमोर उडी; नालासोपारा स्थानकातील घटना
ADVERTISEMENT
मुलीने घरी आल्यानंतर पालकांना घडलेला प्रकार सांगितला. ज्यानंतर पालकांनी याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
घरगुती वादातून पत्नीची कोयत्याने गळा चिरुन हत्या, आरोपी पती फरार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT