TET Exam Scam : पैसे, सोनं, एफडी… तुकाराम सुपेंच्या घरात सापडलं लाखो रुपयांचं घबाड!
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने राज्यातील परीक्षांत झालेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आरोग्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाबरोबरच 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलं असून, पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंनाच बेड्या ठोकल्या आहेत. उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घराची झाडाझडती घेतली, यावेळी घरातही लाखो रुपयांचं घबाड पोलिसांच्या […]
ADVERTISEMENT

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने राज्यातील परीक्षांत झालेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आरोग्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाबरोबरच 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलं असून, पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंनाच बेड्या ठोकल्या आहेत. उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घराची झाडाझडती घेतली, यावेळी घरातही लाखो रुपयांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलीस म्हाडा परीक्षाच्या पेपरफुटी प्रकरणापर्यंत पोहोचले. त्यानंतर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं.
TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! तुकाराम सुपेंनी लाटले 1.70 कोटी, देशमुखला मिळाले 1.25 कोटी
ज्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीकडून म्हाडाची परीक्षा घेण्यात येणार होती. त्याच कंपनीने टीईटी परीक्षा घेतली होती. या कंपनीचा मालक डॉ. प्रितीश देशमुख आणि त्याच्या दोन एजंटला हाताशी धरून राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि आणि शिक्षण विभागातील सल्लागार पदी कार्यरत असलेल्या अभिषेक सावरीकर यांनी पैसे घेऊन उमेवादारांना पास केल्याचं समोर आलं.










