Thackeray कडून मशालही काढून घेण्याची तयारी, ‘या’ पक्षाची थेट शिंदेंकडे धाव
Now preparing to take away the Mashal symbol from Uddhav Thackeray: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) मिळाला. पण, शिंदेंना धनुष्यबाण देताना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मशाल (Mashal) चिन्हाचाही उल्लेख केला आहे. यात मशाल चिन्हं हे फक्त चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरेंकडे असेल असं […]
ADVERTISEMENT
Now preparing to take away the Mashal symbol from Uddhav Thackeray: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) मिळाला. पण, शिंदेंना धनुष्यबाण देताना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मशाल (Mashal) चिन्हाचाही उल्लेख केला आहे. यात मशाल चिन्हं हे फक्त चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरेंकडे असेल असं निवडणूक आयोगानं (Election Commission) म्हटलं आहे. अशातच आता ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्ह देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एकीकडे धनुष्यबाण गमवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्हही देऊ नये यासाठी समता पक्षानं (samata party) दावा ठोकला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. (bow and arrow are gone now preparing to take away the mashal symbol from uddhav thackeray samata party is meet straight to cm shinde)
ADVERTISEMENT
आता समता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. शिंदेंनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
शिंदे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘बिहार राज्यातल्या समता पक्षाच्या शिष्टमंडळानं आज ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.’
हे वाचलं का?
Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?
#बिहार राज्यातील समता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.या भेटीत त्यांनी समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करण्याची विनंती मला केली. pic.twitter.com/MmjoEAIHeF
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 21, 2023
ADVERTISEMENT
‘समता पक्ष हा बिहारमधील जुना पक्ष असून ‘मशाल’ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर निवडणूक आयोगानं हे चिन्ह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
या निर्णयाविरोधात समता पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून ज्या पद्धतीनं आम्हाला शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांचे ‘मशाल’ हे अधिकृत पक्षचिन्ह मिळावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली. असं एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या निर्णयाविरोधात समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून ज्या पद्धतीने आम्हाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळाले त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांचे 'मशाल' हे अधिकृत पक्षचिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी माझ्याकडे केली.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 21, 2023
पण, बिहारमधल्या समता पक्षानं निवडणूक आयोग आणि चिन्हाच्या संबंधित सहकार्य करण्याची मागणी शिंदेंकडेच का केली? असा प्रश्न आता विचारला जातो आहे. याआधीच धनुष्यबाण शिंदेंना मिळाल्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर आरोप केले जातात. त्यात आता समता पक्षानं शिंदेंना सहकार्याची मागणी केल्यामुळे ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार? हे बघणं महत्वाचं आहे.
Shiv sena : पक्ष गमावला, आता उद्धव ठाकरेंच्या हातात काय राहणार?
आमचं ‘मशाल’ चिन्हही काढून घेतील: उद्धव ठाकरे
धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर निशाणा साधला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलं होतं की, ‘आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं.. मी मला मिळालेल्या मशाल चिन्हावर तुमच्याशी लढेन. पण आता मला अशीही शंका आहे की, आपल्याला मिळालेली मशाल देखील काढून घेतली जाऊ शकते. सध्या अतिशय नीच आणि घाणेरडं असं राजकारण सुरू आहे.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT