Thackeray गटाने टाकला डाव; विधान परिषदेत CM एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव
Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्यामार्फत हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप […]
ADVERTISEMENT
Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray :
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्यामार्फत हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते. याच आरोपांवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. (Thackeray group infringement motion against CM Shinde in Legislative Council)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे प्रस्तावात?
महोदय/ महोदया,
मी महाराष्ट्र विधानपरिषद नियम २४१ अन्वये महानगर मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याविरुध्द खालीलप्रमाणे विशेषाधिकारभंगाची सूचना देत आहे.
ADVERTISEMENT
रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०१३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी, विद्याथ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरुन बहिष्कार घातला होता. तदनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे वक्तव्य केलेले आहे. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अश्या होन भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा व सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग य अवमान झाला आहे. उक्त प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे विरुध्द भी हक्कभंगाचा प्रस्ताव देत आहे.
ADVERTISEMENT
कृपया सदरहू प्रस्ताव स्वीकृत करुन पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधानपरिषद विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी आपणांस विनंती आहे.
Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग
काय म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांनी?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका करताना आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असं म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, जे त्यांचे मंत्री तुरुंगात गेले, हसिना पारकर, दाऊदची बहिण. तिला चेक दिला ज्यांनी देशद्रोह केला, त्यांचा राजीनामा घेण्याचीही धमक नव्हती, बरं झालं, त्यांचे साथीदार अजित पवार आहेत आणि त्यांच्यासोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं, असं शिंदे म्हणाले होते.
CM शिंदेंविरोधात ठाकरे हक्कभंग प्रस्ताव आणणार; सरकार धोक्यात?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या याच आरोपांवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून आता मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर अंबादास दानवे यांच्यासह सुनिल शिंदे आणि इतरही आमदारांच्या सह्या आहेत. दुसऱ्या बाजूला विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने शिवसेना (UBT) संजय राऊत यांच्याविरोधात सत्ताधारी आमदारांकडून हक्कभंग प्रस्ताव आणण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
ADVERTISEMENT