ठाणे: महापौर, आमदार यांनी नियम डावलून घेतली कोरोना लस, भाजपचा आरोप
‘कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोनाची लस घेतली. महापौर नरेश म्हस्के यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात नरेश म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही, अन् होणारही नाही.’ अशी जोरदार टीका भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली […]
ADVERTISEMENT

‘कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोनाची लस घेतली. महापौर नरेश म्हस्के यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात नरेश म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही, अन् होणारही नाही.’ अशी जोरदार टीका भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वाना समजण्यासाठी लस घेतली असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखविणार का? असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे महापालिकेने उभारलेल्या विशेष कोविड हॉस्पिटलमध्ये 20 फेब्रुवारी रोजी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी कोरोनाची लस घेतली होती. तसेच आपले फोटोसेशन करून घेतले होते. या प्रकाराला मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे.
भाजपच्या गटनेत्याचा महापौरांवर हल्लाबोल