मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या ‘उत्तर’ सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. या भाषणावरुन भाजपचा अपवाद वगळता अन्य पक्षांनी राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली होती. अशावेळी ९ तारखेला ठाण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या ‘उत्तर’ सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. या भाषणावरुन भाजपचा अपवाद वगळता अन्य पक्षांनी राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली होती. अशावेळी ९ तारखेला ठाण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
ADVERTISEMENT
ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवर मनसेने ही सभा आयोजित केली होती. परंतू रस्त्यात होणारा अडथळा आणि वाहतूक कोडींचं कारण देत ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. शहरातील इतर ठिकाणी बंदिस्त सभागृहात किंवा खुल्या मैदानावर सभा घेण्याच्या सूचना ठाणे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान राज ठाकरेंच्या सभेला ठरलेल्या जागी परवानगी देण्यात यावी यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर उद्या ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण ठरेल असं कळतंय. दरम्यान मनसेचे स्थानिक पदाधिकारी याच ठिकाणावर राज ठाकरेंची सभा होणार असा निर्धार करताना दिसत आहे. दरम्यान माजी आमदार आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आज डॉ. मुस रोडवर राज ठाकरेंची सभा होणार आहे त्या जागेची आज पाहणी केली. त्यामुळे ठाणे पोलीस आता याबद्दल नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
‘बाळासाहेब, आपले सुपुत्र उद्धव ठाकरे हिंदू असून…’; मनसेचं शिवसेना भवनासमोरच होर्डिंग
गुढीपाडव्याच्या सभेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. या विधानावरुन सध्या राज्यात अनेक पडसाद उमटत आहेत. अशावेळी राज आपल्यावरील टीकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT