ठाणे : आईने पाच महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी ठाण्याच्या कळवा परिसरातील महात्मा फुले नगरात २५ तारखेला पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये पाच महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात आईने आपल्या बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू तपासाअंती आईनेच आपल्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालंय. २४ डिसेंबरला शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात राहत्या […]
ADVERTISEMENT

– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी
ठाण्याच्या कळवा परिसरातील महात्मा फुले नगरात २५ तारखेला पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये पाच महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात आईने आपल्या बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू तपासाअंती आईनेच आपल्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालंय.
२४ डिसेंबरला शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात राहत्या घरातून आपल्या बाळाचं अपहरण केल्याची तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. २५ तारखेला तपासादरम्यान पोलिसांना घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तपासाची सूत्र वेगाने हलवत अवघ्या २४ तासांत पोलिसांनी बाळाच्या हत्येचा खरा आरोपी शोधून काढला. खुद्द शांताबाईंनीच आपल्या बाळाला ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालं आहे.
NCB चे अधिकारी असल्याचं भासवत खंडणीसाठी दबाव, भोजपूरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोन आरोपी अटकेत