शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, मलाईदार खाती कोणाकडे?
मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती आता त्यांना खाती मिळाली […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती आता त्यांना खाती मिळाली आहेत.
भाजपला कोणती खाती मिळाली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस– गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय