Modis cabinet expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची सगळ्यात मोठी न्यूज, प्रकाश जावडेकरांनाही मंत्रिमंडळातून हटवलं!
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोदींनी दिग्गज मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, भाजपमधील दिग्गज नेते आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. वाढतं वय यामुळे […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोदींनी दिग्गज मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, भाजपमधील दिग्गज नेते आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. वाढतं वय यामुळे प्रकाश जावडेकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात आल्याचं समजतं आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले प्रकाश जावडेकर हे राज्यसभा सदस्य आहेत. मागील टर्ममध्ये देखील ते मोदींच्या मंत्रिमंडळात होते. मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळात देखील कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आता जवळजवळ मंत्रिमंडळाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.
हे वाचलं का?
यावेळी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील 12 जणांचा राजीनामा घेतला. यामध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पण यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रकाश जावडेकर यांनाच मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला.
खरं तर प्रकाश जावडेकर हे पंतप्रधान मोदी यांच्या निकटवर्तीय समजले जातात. पण त्यांचाच राजीनामा घेण्यात आल्याने मोदींच्या मनात नेमकं काय चाललं आहे याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
मोदी मंत्रिमंडळातून कोणकोणत्या मंत्र्यांना मिळाला डच्चू?
ADVERTISEMENT
• डॉ. हर्षवर्धन (आरोग्यमंत्री)
• रविशंकर प्रसाद (कायदे मंत्री)
• प्रकाश जावडेकर (पर्यावरण मंत्री )
• रमेश पोखरियाल निशंक (शिक्षण मंत्री)
• संतोष गंगवार (कामगार मंत्री)
• देबोश्री चौधरी (महिला आणि बालविकास राज्यमंत्री)
• सदानंद गौडा (रसायन आणि खते मंत्री)
• संजय धोतरे (शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री)
• थावरचंद गहलोत (सामाजिक न्यायमंत्री)
• प्रताप सारंगी (दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री)
• रतनलाल कटारिया (जलशक्ती राज्यमंत्री)
• बाबुल सुप्रियो (पर्यावरण राज्यमंत्री)
Cabinet reshuffle: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचाही राजीनामा
महाराष्ट्रातील 4 खासदारांची मंत्रिमंडळात लागली वर्णी
दरम्यान, महाराष्ट्रातील नेते प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांचा राजीनामा घेण्यात आला असला तरीही चार मंत्र्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे.
नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड या चार खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यापैकी नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित तीनही मंत्र्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती तेव्हापासून खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण अगदी शेवटच्या क्षणी प्रीतम मुंडे यांचं नाव मागे पडून भागवत कराड यांच्या नावा पसंती देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT