महाराष्ट्रात कोव्हिडचा संसर्ग वाढू लागल्याने मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोव्हिडचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर टास्क फोर्सची बैठकही पुन्हा आय़ोजित करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढत्या कोरोना संसर्गावर चिंताही व्यक्त केली आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात 900 हून जास्त कोरोना रूग्ण आढळले आहेत. तसंच महाराष्ट्रातल्या रूग्णांची संख्या 1600 पेक्षा जास्त होती. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई : डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह, महापालिकेनं लॅब केली सील

आज नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

हे वाचलं का?

‘कोव्हिडचा संसर्ग राज्यात वाढतो आहे. तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. आपल्याला जास्त दक्षता बाळगून त्या अनुषंगाने पावलं उचलावी लागणार आहेत. टास्क फोर्सची बैठकही करण्यात यावी.’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जात आहेत असंही स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

ADVERTISEMENT

डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते . मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.

लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेलेही रूग्ण आढळत आहेत. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित 31 रूग्ण रविवारी आढळले. त्यातले 27 रूग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित रूग्णांची संख्या 141 झाली आहे त्यातले 73 रूग्ण हे मुंबईत आहेत.

ओमिक्रॉनचे राज्यात कुठे किती रूग्ण आहेत?

मुंबई – 73

पिंपरी- 19

पुणे ग्रामीण-16

पुणे महापालिका-7

सातारा-5

उस्मानाबाद-5

ठाणे-3

कल्याण डोंबिवली-2

नागपूर-2

औरंगाबाद-2

बुलढाणा-1

लातूर-1

अहमदनगर-1

अकोला-1

वसई-1

नवी मुंबई-1

मीरा भाईंदर-1

ही सगळी स्थिती पाहता याबद्दल डॉ. शशांक जोशी यांना विचारलं असता पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन आठवड्यात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT