सरकारमधील काही आमदारांच्या सांगण्यावरुन पाचवा उमेदवार उभा केला- मुनगंटीवार
योगेश पांडे, नागपूर नागपूर: विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुर्ण झाली आहे. त्यात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या भाई जगतापांना फटका बसला आहे. भाजपच्या प्रसाद लाडांचा विजय झाला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांची प्रतिक्रिया काही वेळापुर्वी समोर आली होती. राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला मतदान करणाऱ्या महविकास आघाडीमधील काही आमदारांनी आम्हाला सूचना केली होती […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर: विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुर्ण झाली आहे. त्यात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या भाई जगतापांना फटका बसला आहे. भाजपच्या प्रसाद लाडांचा विजय झाला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांची प्रतिक्रिया काही वेळापुर्वी समोर आली होती.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला मतदान करणाऱ्या महविकास आघाडीमधील काही आमदारांनी आम्हाला सूचना केली होती की विधान परिषद निवडणुकीमध्ये ही पाचवा उमेदवार उभा करा, त्यांचं म्हणणं होतं की विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून आम्ही या सरकार संदर्भात आपला असंतोष व्यक्त करू त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही पाचवा उमेदवार उभा केला असून आम्हाला विश्वास आहे की आमचा पाचवा मिळवा जिंकून येईल असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
हे वाचलं का?
महविकास आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या आमदारांना बद्दल अशी शंका व्यक्त करणं, अविश्वास व्यक्त करणे योग्य नाही, भाजप आपल्या आमदारांबद्दल अशी शंका व्यक्त करणार नाही. महाविकास आघाडीचा एक मत बाद झाला आहे. याबद्दल माहिती नाही मात्र बाद झाला असेल तर त्याचा आनंद आहे असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. भाजपचे दोन्ही आजारी आमदार सर्व परवानग्या घेऊनच मतदान करायला आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT