Omicron: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा कहर थांबेना! नव्या 198 रूग्णांची नोंद, 190 रूग्ण एकट्या मुंबईत
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबईसह महाराष्ट्रात कहर माजवला आहे. हा कहर थांबायचं नाव घेत नाहीये. NIV ने हे सगळे रूग्ण नोंदवले आहेत. दिवसभरात 198 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यातले 190 रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. एककीडे कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 198 नवे रूग्ण आढळले आहेत. […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबईसह महाराष्ट्रात कहर माजवला आहे. हा कहर थांबायचं नाव घेत नाहीये. NIV ने हे सगळे रूग्ण नोंदवले आहेत. दिवसभरात 198 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यातले 190 रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. एककीडे कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 198 नवे रूग्ण आढळले आहेत. हे सगळे रूग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने म्हणजेच NIV ने नोंदवले आहेत. या 198 रूग्णांमध्ये 30 आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.
हे वाचलं का?
Omicron Variant: ‘पुढील महिना सर्वात धोकादायक’, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा
198 रूग्ण कुठे आहेत?
ADVERTISEMENT
मुंबई-190
ADVERTISEMENT
ठाणे मनपा- 4
सातारा, नांदेड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 1
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका 52 वर्षाच्या पुरुषाचे 28 डिसेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील 13 वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत राज्यात एकूण 450 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
मुंबई-327
पिंपरी चिंचवड-26
पुणे ग्रामीण-18
पुणे मनपा आणि ठाणे मनपा-12
नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली प्रत्येकी 7
नागपूर आणि सातारा प्रत्येकी 6
उस्मानाबाद 5
वसई विरार आणि नादेंड प्रत्येकी 3
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर प्रत्येकी 1
एकूण-450
यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 125 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 5368 नव्या रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये. दिवसभरात राज्यात 5368 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT