Uddhav Thackeray: ”बावनकुळेंची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना कोणी संपवू शकत नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर प्रथमच मार्मिक साप्ताहिकाचा वर्धापन दिन पार पडला. मार्मिकच्या या ६२ व्या वर्धापन दिनानिमीत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना आणि ऑनलाईन संबोधित केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अजरामर कलाकृती म्हणून मार्मिककडे पाहिलं जातं.

ADVERTISEMENT

मार्मिकच्या कार्यक्रमात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

”मार्मिकला ६२ वर्ष झाली आहेत ते अजून चिरतरुण आहे. माझंही वय ६२ आहे त्यामुळे हे ऐकूण मला हुरुप आला. मार्मिक काय शिवसेना काय हे सर्व चिरतरुण आहे. मार्मिक नसतं तर हिंदूचं काय झालं असतं हे कोणी सांगू शकत नाही. मार्मिकनं शिवसेनेला जन्म दिला असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.”

आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या घडामोडींवर देखील भाष्य केले. १९७८ मधील व्यंगचित्र दाखवत त्यावेळच्या परिस्थितीवरती बाळासाहेब ठाकरे कसे व्यक्त झाले होते ते सांगितले. सध्याची परिस्थिती पाहाता लोकशाही किती जिवंत राहणार आहे याचा विचार केला पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

बावनकुळेंची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना संपणार नाही- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी घर घर तिरंगा या अभियानावर देखील टीका केली आहे. GST मुद्द्यावर एक व्यंगचित्र दाखवत ठाकरेंनी केंद्राला टोमणा मारला आहे. यावेळीही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे जे वक्तव्य केलं होतं त्याचा समाचार घेतला आहे. बावनकुळेंची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना कोणी संपवू शकत नाही. ते ‘बावन’कुळे असो की १५२ असो मला काही फरक पडत नाही असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री सत्कार स्विकारण्यात व्यक्त- उद्धव ठाकरे

राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरती देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. राज्यात अतिवृष्टीचं संकट असताना राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्विकारण्यात व्यक्त आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे पण अजून खातेवाटप नाही त्यामुळे सर्व मंत्री ‘आझाद’ फिरत आहेत असेही ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

डीपीवरती तिरंगा टाकणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु सैन्यातील सैन्य कपात कशाला हवी. लष्कर आधूनिक करण्याकडे हा पैसा वापरणार असं म्हणत आहेत, तुमच्याकडे सरकार पाडण्यासाठी पैसे आहेत पण सैन्यासाठी असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. देशातील परिस्थितीवरती व्यगचित्र काढण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT