पुणे येथील Army Sports Institute मधल्या स्टेडियमला Neeraj Chopra चे नाव
पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथील स्टेडियमचे नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे, दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित होते. यावेळी संरक्षणमंत्री सिंह यांच्या हस्ते टोकियो ऑलिंम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा यांच्यासह लष्करी सेवेतील 16 ऑलिंपिक वीरांचा विशेष सत्कार करण्यात आला. […]
ADVERTISEMENT
पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथील स्टेडियमचे नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे, दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित होते. यावेळी संरक्षणमंत्री सिंह यांच्या हस्ते टोकियो ऑलिंम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा यांच्यासह लष्करी सेवेतील 16 ऑलिंपिक वीरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ADVERTISEMENT
ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. यापुढील क्रीडा स्पर्धांमध्येदेखील जास्तीत जास्त भारतीय खेळाडू सहभागी होतील. यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तम प्रशिक्षण पुरविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भारत सरकार मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच भविष्यात भारत ऑलिंम्पिक स्पर्धेचा आयोजक देश बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. तर भारताला स्पोर्टस पॉवर बनविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की,आपल्या देशाच नाव सर्व खेळाडूंनी जगभरात सर्वच स्थानावर घेऊन गेलेत. हे सर्व खेळाडू अभिनंदन पात्र आहेत.आजवर ज्या खेळाडूंनी पदकं मिळविली आहेत.त्या खेळाडूच्या पंक्तीत आता सुभेदार नीरज चोप्रा हे जाऊन बसले आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. तसेच आपल्या सर्वासाठी करोनाचा काळ कठिण होता. तेव्हा आपल्या जवानांनी अनेक खेळाडूंना घरी जाऊन साहित्य दिले. तर काहींच्या घराजवळ शूटिंग रेंज तयार केली.यामुळे सर्व जवानांचे अभिनंदन करतो.
हे वाचलं का?
येणार्या काळात आपण सर्व प्रकाराच्या खेळाकडे लक्ष देणार आहोत, यातून अधिकाधिक कसे पदकं मिळतील याकडे विशेष लक्ष असणार आहे. त्याचसोबत ज्यावेळी इतिहासाकडे पाहतो, तेव्हा महाभारत रामायणातही खेळ हे शिक्षणाचा भाग होते. त्यामुळे सरकार देशातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे आणि कायम सोबत राहणार आहे. आता खेळामध्ये महिलांची संख्या कशी वाढेल. यावर देखील लक्ष असणार आहे. त्याच बरोबर आज ज्या भूमीमध्ये आलो आहे. त्या भूमीमधील खेळामुळेच बालशिवाजी छत्रपती शिवाजी बनले. माता जिजाऊ, दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासांनी त्यांना क्रीडाप्रकारातूनच डावपेच शिकवले.नेमबाजी तलवारबाजी कुस्ती अशा माध्यमातून आपल्या इतिहासातही खेळांची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT