रिक्षाचालकासह दोघांनी केला महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग, पिंपरीतली धक्कादायक घटना
समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये बेदरकारपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकाने त्याच्या इतर सहकाऱ्यांनी संगमनत करून एका महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केला. तिचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे: वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग या प्रकरणात पीडित महिला पोलिस शिपाई हीने भोसरी एम आय डि सि […]
ADVERTISEMENT
समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवडमध्ये बेदरकारपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकाने त्याच्या इतर सहकाऱ्यांनी संगमनत करून एका महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केला. तिचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे: वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग
हे वाचलं का?
या प्रकरणात पीडित महिला पोलिस शिपाई हीने भोसरी एम आय डि सि पोलीस स्टेशन मध्ये ऑटो रिक्षा चालका सह इतर अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर त्या नंतर पोलिसांनी विश्वदीप भारत मादलापुरे,अभिषेक बाळासाहेब पोळ, आणि सुनील शिवाजी कसबे,या तीन आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात ही घेतले आहे
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२०० बाईक्स तपासत डोंबिवली पोलिसांनी विकृत नराधमाला केली अटक
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहिती अनुसार महिला शिपाई वर्दीवर असताना तिला भर रस्त्यावरून ऑटो रिक्षा चालक विश्वदीप भारत मादलापुरे हा बेदरकारपणे आटो रिक्षा चालवताना दिसला. लोकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून फिर्यादी महिला पोलीस शिपाई ने ऑटोरिक्षा चालकाला भारतमाता चौकात थांबवून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता वर्दीवर असलेल्या पोलीस महिला शिपाईला ऑटो मध्ये बसलेल्या इतर आरोपींनी बळजबरी पूर्वक ऑटोच्या आता ओढण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.
ADVERTISEMENT
या घटनेमुळे एकूणच पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली असून , घटनेचे गांभीर्य पाहून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली आहे की पूर्वी कधी असा प्रकार इतर कोणा सोबत ही त्यांनी केला होता का ? याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT