गोवावासियांना भाजपनं दिलं गिफ्ट! प्रमोद सावंतांनी पहिल्याच बैठकीत घेतला निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होताच भाजपनं गोव्यातील नागरिकांना गिफ्ट दिलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोव्यातील रहिवाशांना एका वर्षात ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

ADVERTISEMENT

आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा एकदा डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारली. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात सावंत यांच्याबरोबरच विश्वजित राणे, मौविन गोडिन्हो, रवी नाईक, नीलेश कबराल, सुभाष शिरोडकर, रोहन खौटे, अतानासियो मोनसेरेट, गोविंद गौडे यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, नितीन गडकरी, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

हे वाचलं का?

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना प्रमोद सावंत म्हणाले, “पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी जबाबदारीची गोष्टी आहे. आम्ही गोव्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. केंद्राकडून खूप मदत केली गेली आणि येणाऱ्या काळात आणखी मिळेल. जेणे करून गोव्याला आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याचं वचन पूर्ण करू शकू,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मागच्या वेळी भाजपने अचानक डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली होती. त्यामुळे त्यांना अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हटलं जात होतं. यावर बोलताना सावंत म्हणाले, “आता मी निवडलेला नाही, तर निवडून आलेलो आहे.”

ADVERTISEMENT

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी आर्थिक वर्षापासून वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.

ADVERTISEMENT

या शपथविधी सोहळ्या देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. दरम्यान, सरकारसमोरील आव्हानांबाबत ते म्हणाले की, “सरकारसमोर आव्हानं असतील, मात्र, आव्हानांवर नेहमीच अंकुश मिळवला गेला आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार शांतता आणि विकास करेल, कारण या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे.”

“ही सेमी फायनल आहे. २०२४ मध्येही सगळीकडे मोदीचं असतील. मी तर हेच म्हणेन की, मोदी लाट अजिबात कमी झालेली नाही. आता तर मोदी त्सुनामी येईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT