सोलापुरातल्या मार्डी गावातल्या शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूरमधल्या मार्डी या गावामध्ये शेतातील शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या मुलींचा पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली आहे. सानिका सोनार ( वय 17 ) , पूजा सोनार ( वय 13 ) आणि आकांक्षा युवराज वडजे (वय 11 ) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

ADVERTISEMENT

गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली.असून सानिका , पूजा आणि आकांक्षा या तीन मुली पाणी पिण्यास शेत तळ्यावर गेल्या होत्या.त्यांचा पाय घसरला आणि बुडून त्या 3 मुलीचा मृत्यु झाला आहे.अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

हे वाचलं का?

या घटनेने मार्डी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.रानात जळण गोळा करायला या तिन्ही मुली गेल्या होत्या. तहान लागल्याने पाणी पिण्यास शेततळ्यात उतरल्या आणि ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे.

ही घटना घडल्यानंतर या मुलींच्या कुटुंबीयांनीही तिथे धाव घेतली. सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. हा संपूर्ण परिसर त्यांच्या आर्त स्वरांनी शोकाकूल झाला होता. हुंदके, रडणं हे सगळं ऐकून सगळ्यांचंच हृदय पिळवटून निघालं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT