लातूर : काळीपिवळीचा चक्काचूर, बोलेरो 150 लांब जाऊन पडली खड्ड्यात; तीन प्रवासी ठार
लातूर जिल्ह्यात औसा-लामजना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार झाले, तर 13 जण जखमी झाले. वाघोली पाटीजवळ बोलेरो आणि काळीपिवळीची समोरासमोर धडक झाली. शनिवारी (25 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही वाहनांच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर झाले आहेत. तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील […]
ADVERTISEMENT

लातूर जिल्ह्यात औसा-लामजना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार झाले, तर 13 जण जखमी झाले. वाघोली पाटीजवळ बोलेरो आणि काळीपिवळीची समोरासमोर धडक झाली. शनिवारी (25 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दोन्ही वाहनांच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर झाले आहेत. तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी (एमएच 24 एफ 0959) औसावरून लामजन्याकडे प्रवासी घेऊन जात होती. तर बोलेरो गाडी (एमएच 30 एए 4809) लामजन्यावरून औसाकडे जात होती. वाघोली पाटीजवळ दोन्ही गाड्या अचानक समोरासमोर आल्या आणि भयंकर अपघात घडला.
अपघात इतका भीषण होता की यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला, तर बोलेरो गाडी 150 फुट लांब जावून खड्ड्यात पडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन येत असताना मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.