सोनाली फोगाटकडे होतं ५० तोळे सोनं, जमीन, बँक बॅलन्ससह ‘एवढ्या’ संपत्तीची होती मालकीण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपच्या नेत्या, सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाटचा वादग्रस्त मृत्यू मागच्या आठवड्यात झाला आहे. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया हँडलवर सोनाली फोगाट प्रसिद्ध होती. म्युझिक व्हीडिओ आणि सिनेमांमध्येही ती काम करत होती. सेल्फ मेड महिला होत सोनाली फोगाटने स्वतःचं करिअर घडवलं होतं. मात्र आता त्यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला आहे. त्यामुळे संपत्तीसाठी तर सोनाली फोगाटची हत्या करण्यात आली नाही ना? अशी चर्चा आता होते आहे.

ADVERTISEMENT

सोनाली फोगाटच्या संपत्तीसाठी तर त्यांची हत्या करण्यात आली नाही ना? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. सोनाली फोगाटकडे नेमकी संपत्ती किती होती हे देखील लोक शोधत आहेत. अशात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सोनाली फोगाटकडे किती संपत्ती होती?

सोनाली फोगाटने २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती

२०१९ मध्ये सोनाली फोगाटने हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट दिलं होतं. सोनाली फोगाटने कुलदीप बिश्नोईच्या विरोधात आदमपूरमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सोनाली फोगाटला यश मिळालं नाही. मात्र आदमपूरमधून निवडणूक लढवण्याआधी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. यामध्ये त्यांची संपत्ती उघड झाली आहे.

हे वाचलं का?

सोनाली फोगाटकडे किती संपत्ती आहे?

सोनाली फोगाटकडे २५ लाख ६१ हजार जंगम मालमत्ता आहे. तर २.४८ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. सोनाली फोगाट दहावी पास होती. १९९५ मध्ये सोनालीने हरयाणातून SSC केलं होतं. प्रतिज्ञापत्रानुसार सोनाली फोगाटकडे १२ लाख रूपये कॅश होते. तर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेच्या एकूण तीन खात्यांमध्ये ५ लाख ११ हजार ६४० रूपये होते. तसंच ५० तोळे सोनं आणि १९ लाख २५ हजारांचे दागिने होते. सोनाली फोगाटवर कोणत्याही प्रकारचं बँक लोन नव्हतं.

ADVERTISEMENT

सोनाली फोगाटच्या इतर संपत्तीबाबत बोलायचं झालं तर सोनालीकडे ६ एकर जमीन होती. त्याची किंमत २०१९ मध्ये २ कोटी १५ लाख रूपये होती. सोनालीच्या मुख्य कमाईचा स्रोत अभिनय आणि शेती करणं हा होता. एका माहितीनुसार सोनाली फोगाट एका सिनेमासाठी २० ते २५ लाखांचं मानधन घेत होती. तर बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याबद्दल सोनालीला एका एपिसोडसाठी ८० हजार या प्रमाणे पैसे मिळत होते.

ADVERTISEMENT

सोनाली फोगाटचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. आधी सोनाली फोगाटचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला अशी माहिती समोर आली. मात्र याबाबत फोगाट कुटुंबाने संशय व्यक्त केला. पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर हळूहळू अनेक गोष्टींचा खुलासा झाला. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत चारजणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT