खड्ड्यात गेली आमदारकी ! पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या राजू पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रीया
कल्याण ग्रामीण मतदारसंघात भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर आज मनसे आणि भाजप एकत्र आलेले पहायला मिळाला मिळाले. भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC प्रशासनावर विशाल मोर्चा काढला. परंतू या मोर्चाला आंदोलनकार्त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आयुक्तांची अनुपस्थिती होती, ज्यावर राजू पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीत सध्या अनेक नागरिकांना […]
ADVERTISEMENT
कल्याण ग्रामीण मतदारसंघात भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर आज मनसे आणि भाजप एकत्र आलेले पहायला मिळाला मिळाले. भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC प्रशासनावर विशाल मोर्चा काढला. परंतू या मोर्चाला आंदोलनकार्त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आयुक्तांची अनुपस्थिती होती, ज्यावर राजू पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीत सध्या अनेक नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. परंतू मोर्चेकऱ्यांना घेऊन महापालिका मुख्यालयावर धडक मारणाऱ्या दोन्ही आमदारांची चर्चा करायला पालिकेचे आयुक्त आणि एकही मोठा अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे प्रशासन नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोप दोन्ही आमदारांनी केला.
लोकांचा प्रश्न जर हे प्रशासन गांभीर्याने घेणार नसेल तर खड्ड्यात गेली ती कामगिरी. लोकांचे प्रश्न गांभीर्याने न घेणं या प्रशासनाला चांगलंच महागात पडेल. आपल्याला लाजा वाटायला हव्यात, प्रश्नाचं निराकारण झालं नाही तर मी स्वतः प्रशासकीय इमारतीला टाळं ठोकून बाहेर उभा राहीन, मग बघू कोण येतं अशा शब्दांत राजू पाटलांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
हे वाचलं का?
साधारणपणे ज्याठिकाणी एखाद्या गावात टँकर सुरू होतो तो भाग जिल्हाधिकारी दुष्काळग्रस्त घोषित करतात. सध्याच्या घडीला 27 गावांमध्येही 200 पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा होत असेल तर हा संपूर्ण भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार रविंद चव्हाण यांनी यावेळी केली. दरम्यान मनसे आणि भाजपने एकत्रित काढलेल्या मोर्चाबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांना विचारले असता लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही यापूर्वीही अनेकदा एकत्र आलो आहोत. लोकहितासाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची कोणतीही हरकत नसून पूर्वीसुद्धा एकत्र होतो आणि आताही आम्ही एकत्र असल्याचे आमदार रविंद चव्हाण यांनी सांगितले.
27 गावांना केडीएमसी प्रशासनाने वाऱ्यावर सोडले असून या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. प्रशासकीय कार्यवाही आम्हाला शिकवू नका, नको तो शहाणपणा करायचं नाही. तुम्हाला माज आलाय, आम्हाला तुम्ही काय वेडे समजताय का ? पाणी पुरवठ्याबाबत धोरणात्मक निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात काय अडचण आहे? असा संतप्त सवाल विचारत उपस्थित प्रशासनावर दोन्ही आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT