माथाडी युनियनमध्ये ‘टोळी’ युध्द?, सुरेशराव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई तक

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्यामध्ये कंपनीतील कामगार टोळ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले आहे. याबाबत मुंबई-ठाणे येथील चितळकर पोलीस ठाण्यात आ. शशिकांत शिंदे यांचे समर्थक सुरेश गायकवाड यांच्यासह पाच जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. माथाडी युनियनमध्ये टोळ्यांवरून अनेकदा वाद उफाळून येत असतात. याच वादातून गेल्या काही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्यामध्ये कंपनीतील कामगार टोळ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले आहे. याबाबत मुंबई-ठाणे येथील चितळकर पोलीस ठाण्यात आ. शशिकांत शिंदे यांचे समर्थक सुरेश गायकवाड यांच्यासह पाच जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

माथाडी युनियनमध्ये टोळ्यांवरून अनेकदा वाद उफाळून येत असतात. याच वादातून गेल्या काही वर्षांपूर्वी माथाडी कामगार युनियनचे नेते वसंतराव मानकुमरे यांना ‘पुजारी’ नामक व्यक्तीने जिवे मारण्याचा इशारा दिला होता. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. त्यावेळी माथाडी कामगार युनियनचे वजनदार नेते व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. पुढे जावली तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली तशी शिंदे व मानकुमरे यांच्यात घट्ट जवळीक वाढली. गेली पाच-सहा वर्षे वादाविना गेली.

वादाला तोंड फुटले