हॉटेलमध्ये एक तरुणी अन् दोन तरुण, 18 लाखांचा व्यवहार अन् पोलीस पोहोचले!

मुंबई तक

jaipur hotel room 204 online betting : जयपूरच्या वैशाली नगरमधील हॉटेलच्या रूम नंबर 204 मध्ये अवैध ऑनलाइन सट्टा बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन युवक आणि एका युवतीला ताब्यात घेत इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये एक तरुणी अन् दोन तरुण

point

18 लाखांचा व्यवहार अन् पोलीस पोहोचले!

Crime News : जयपूरच्या वैशाली नगरमधील हॉटेलच्या रूम नंबर 204 मध्ये अवैध ऑनलाइन सट्टा लावण्यात येत असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना हॉटेलमध्ये ऑनलाइन जुगार आणि सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर आत दोन युवक आणि एक युवती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबलेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आली. या उपकरणांची तपासणी सुरू केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?

क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाइन पैसे लावले जात असल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या खोलीतून सुमारे 6 लाख रुपयांच्या व्यवहाराचा हिशोब मिळाला आहे. तसेच आरोपींचा अंदाजे मासिक अवैध व्यवसाय सुमारे 18 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाइन पैसे लावले जात असल्याचा आरोप आहे. मैदानावर सामना सुरू असताना त्याच्या निकालावर हॉटेलच्या खोलीत बसून पैशांचा खेळ सुरू असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप, एक टॅबलेट आणि पाच मोबाइल जप्त केले आहेत.

हेही वाचा : 'काका आणि तीन भावांनी माझ्यासोबत...' पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेसोबत घडलं भयंकर