Maharashtra Bandh: ‘बंद’मध्ये आम्हाला खेचू नका म्हणणारे व्यापारी देखील होणार बंदमध्ये सहभागी!
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध महाराष्ट्रात उद्या (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. सुरुवातीला या बंदला व्यापारी वर्गातून विरोध सुरु होता. पण आता व्यापारी वर्ग देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. नुकतीच याबाबतची माहिती मुंबई […]
ADVERTISEMENT
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध महाराष्ट्रात उद्या (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. सुरुवातीला या बंदला व्यापारी वर्गातून विरोध सुरु होता. पण आता व्यापारी वर्ग देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
ADVERTISEMENT
नुकतीच याबाबतची माहिती मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, पण बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका असं आवाहन विरेन शहा यांनी केलं होतं. मात्र, आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी जाहीर केलं की, उद्याच्या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग हे दुपारी 4 वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
‘महाराष्ट्र बंद’मध्ये व्यापारीही होणार सहभागी!
हे वाचलं का?
शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, पण उद्या सर्व दुकानं सुरुच राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच कालावधीने दुकानं सुरु झाली आहेत. सध्या नोकरांना वेळच्या वेळी पगार देणं जिकरीचं होऊन बसलं आहे. शेतकऱ्यांना आमचा नेहमीच पाठिंबा असेल अशी भूमिका विरेन शहा यांनी घेतली होती.
पण आता त्यांनी आपल्या भूमिकेत काहीसा बदल करुन व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘शिवसेना आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर, FRTWA ने शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या बंदच्या समर्थनार्थ दुपारी 4 पर्यंत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया सर्व क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या आदेशांचे पालन करा. सहयोग करण्यासाठी हा संदेश इतर भागातील व्यापाऱ्यांनाही पाठवा.’ असं म्हणत विरेन शहा यांनी आता बंदमध्ये व्यापारी वर्गही सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईसह ठाण्यातील व्यापारी संघटनांनीही महाराष्ट्र बंदला सुरुवातीला विरोध दर्शवला होता. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्यामुळे झालेलं नुकसान पाहता व्यापारी संघटनांनी ही भूमिका घेतली होती. पण बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद राहतील अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी देखील मध्यममार्ग काढत आपली दुकानं 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आता उद्या व्यापाऱ्यांकडून या बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि तीनही पक्षातील कार्यकर्ते हा बंद कशा प्रकारे यशस्वी करुन दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांना पाठींबा पण बंदमध्ये आम्हाला खेचू नका ! Maharashtra Bandh ला व्यापाऱ्यांचा विरोध
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT