पैशांसाठी दोन दिवस सुरू होते मृतदेहावर उपचार, सांगलीतला धक्कादायक प्रकार

मुंबई तक

मृत रूग्ण जिवंत असल्याचं भासवून दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचा प्रकार सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूरमधल्या आधार हेल्थ केअरचे डॉक्टर रंगराव वाठारकर याला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. वाठारकर विरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरने हा अस प्रकार केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मृत रूग्ण जिवंत असल्याचं भासवून दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचा प्रकार सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूरमधल्या आधार हेल्थ केअरचे डॉक्टर रंगराव वाठारकर याला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. वाठारकर विरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरने हा अस प्रकार केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सायरा हमीद शेख या महिलेला मेंदू पक्षाघातावरील उपचारांसाठी 24 फेब्रुवारीला इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेवर उपचार सुरू असताना 8 मार्चला झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मात्र डॉक्टरांनी या महिलेचा मृतदेह 10 मार्चला ताब्यात दिला. नेमकं दोन दिवस काय झालं? ही परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांविरोधात सायरा यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला.

नगरपालिका नोंदणी विभागात सायरा यांचा मृत्यू 8 मार्चला सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी झाला असल्याची नोंद आहे. मात्र 10 मार्चला त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या प्रकाराचा सायरा यांच्या नातेवाईकांना संशय आला त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली.

पोलिसांनी तपास केला असता सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करण्यात आल्याचं समोर आलं. डॉक्टर योगेश वाठारकर याने बनावट कागदपत्रं तयार करून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल तयार केल्याचंही निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टर योगेश वाठारकरला अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp