स्पेलिंग चुकली अन् कंपनीने वर्षभरातील बिअर महिन्याभरातच विकली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

असं म्हणतात की, तुमचं एक चूकही महागात पडू शकते. पण एका बिअर (Beer)कंपनीकडून झालेली एक चूक ही त्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा देऊन गेली आहे. एका चुकीमुळे कंपनीने एका महिन्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा (1 Crore Liters Beers)जास्त बिअरची विक्री केली आहे.

नेमकी चूक काय?

Heineken-मालकीचा बिअर ब्रँड Tres Cruces गेल्या वर्षी पेरूमध्ये (Peru) लाँच करण्यात आला होता. लाँचच्या अगोदर, कंपनीने पेरूमधील किरकोळ विक्रेत्यांना तीन लाखांहून अधिक बिअर कॅन पाठवले. यावेळी बिअरच्या पॅकेजिंगवर कंपनीचे स्लोगन ‘Disfrute’ लिहिलेले होते. ‘Disfrute’ हा स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ आनंद आहे. मात्र किरकोळ विक्रेत्यांना कॅन पाठवल्यानंतर ‘Disfrute’मधून ‘S’ गायब असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. ही चूक छपाईच्या वेळी झाल असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं. पण झालेल्या या चुकीमुळे अजिबात विचलित न होता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1 कोटी लिटर बिअरची विक्री

‘Disfrute’ हा कंपनीचा लोगो आहे, जो बिअर कॅनवर चुकीच्या पद्धतीने छापण्यात आला होता. ब्रँड लॉन्च करतानाच एवढी मोठी चूक कंपनीला भारी पडू शकते. हे कंपनीला लक्षात आलं. अशावेळी तीन लाख कॅन परत मागवण्याऐवजी कंपनीने एक नवी शक्कल लढवली. कंपनीने या चुकीचे रूपांतर लकी ड्रॉच्या गेममध्ये केले आणि या गेममुळे कंपनीने एका महिन्यात तब्बल एक लाख लिटरहून अधिक बिअरची विक्री केली.

ADVERTISEMENT

कंपनीने सुरू केला लकी ड्रॉ

ADVERTISEMENT

आपली चूक लपवण्यासाठी कंपनीने ग्राहकांना सांगितले की, त्यांच्या काही बिअरच्या कॅनमध्ये जाणूनबुजून स्पेलिंग चूक केली आहे. एखाद्या ग्राहकाला बिअरच्या कॅनवर स्पेलिंगची चूक सापडल्यास त्याला कंपनीकडून बक्षीस जिंकण्याची संधी दिली जाईल. कंपनीने या ऑफरसाठी 1 एप्रिल ते 20 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. यानंतर Tres Cruces बिअरच्या कॅनची तुफान विक्री झाली.

विजेत्यांना मिळालं बक्षीस

कंपनीने ग्राहकांना सांगितले की, जर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक असलेला बिअर कॅन मिळाला तर तुम्ही फोटोसह कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करू शकता. बिअर कॅनच्या तळाशी एक कोड छापलेला आहे. कंपनीने त्या कोडसह स्पेलिंग मिस्टेकचा फोटो अपलोड करण्यास सांगितले होते. मे महिन्यात, कंपनीने लकी ड्रॉद्वारे विजेत्यांची घोषणा केली आणि त्यांना ‘S’ ने सुरू होणाऱ्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये स्पीकर, स्मार्टवॉच, स्कूटर आणि Tres Crucesचा सिक्स पॅक यांचा समावेश होता.

बायकोने फक्त सांगितलं दारु पिऊ नका.. वाचा नवऱ्याने नेमकं काय केलं!

कॅम्पेन ठरलं यशस्वी!

एका रिपोर्टनुसार Tres Crucesची ही मोहीम बऱ्यापैकी यशस्वी ठरली असल्याचं म्हटलं आहे. बक्षीस जिंकण्याच्या लालसेपोटी लोकांनी एप्रिलमध्ये बिअरची तुफान खरेदी केली आणि कंपनीने विक्रमी विक्री केली. Tres Cruces ने एप्रिल महिन्यात 1 कोटी लिटरहून अधिक बिअरची विक्री केली. खरंतर कंपनी एका वर्षात बिअरची एवढी विक्री करते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT