Urfi Javed : तोकडे कपडे घालण्याबद्दल उर्फीने मुंबई पोलिसांना काय सांगितलं?
अभिनेत्री (Actress) उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp Leader Chitra Wagh) यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पोहोचला. चित्रा वाघांनी उर्फी जावेदच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आज पोलिसांनी या प्रकरणी तिची चौकशी केली. यावेळी तिने तोकडे कपडे परिधान करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. (TV actress […]
ADVERTISEMENT
अभिनेत्री (Actress) उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp Leader Chitra Wagh) यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पोहोचला. चित्रा वाघांनी उर्फी जावेदच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आज पोलिसांनी या प्रकरणी तिची चौकशी केली. यावेळी तिने तोकडे कपडे परिधान करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. (TV actress Urfi Javed inquiry by Mumbai Police in connection with indulging in nudity publicly.)
ADVERTISEMENT
तोकडे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होणाऱ्या उर्फी जावेदविरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोहीम उघडली. तोकडे कपडे घालून मुंबईतल्या रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.
Urfi Javed : उर्फीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, तो कोण आहे?
हे वाचलं का?
उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी केल्यानंतर चित्रा वाघ यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. त्यानंतर रितसर तक्रारही दिली, पण त्यावर कार्यवाही काही झाली नाही. त्यानंतर अंबोली पोलीस ठाण्यात चित्रा वाघांनी तक्रार दिली.
चित्रा वाघांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या अंबोली पोलीस ठाण्यातून उर्फी जावेदला नोटीस बजावण्यात आली. चित्रा वाघांनी दिलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर व्हावे, असं पोलिसांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर उर्फी जावेद शनिवारी दुपारी अंबोली पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तिने पोलिसांसमोर तिच्या वेशभूषेबद्दल जबाब नोंदवला.
ADVERTISEMENT
Urfi Javed: चित्रा वाघांची कोंडी करणारी उर्फी जावेद आहे तरी कोण?
उर्फी जावेदनं पोलिसांना काय सांगितलं?
उर्फी जावेदनं पोलिसांना सांगितलं की, ‘मी स्वतंत्र व्यक्ती आहे. मला शूट करायला आणि विशिष्ट प्रकारचे कपडे घालायला आवडतं. संविधानानुसार असं करण गुन्हा नाहीये. जेव्हा मी अशा प्रकारच्या शुटिंगसाठी बाहेर पडते, तेव्हा पापाराझी (सेलिब्रेटींचे फोटो काढणारे फोटोग्राफर) मला शोधात. माझा पाठलाग करतात. ते माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होता. मी ते फोटो व्हायरल करत नाही’, असं उर्फी जावेदनं पोलिसांना सांगितलं.
चित्रा वाघांना माघार घ्यावी लागणार?
उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच चित्रा वाघांनी आक्षेप घेतला होता. प्रोफेशनल कामासाठी वेशभूष करण्याबद्दल हरकत नसल्याचंही चित्रा वाघांनी म्हटलेलं आहे. उर्फीने मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अशी वेशभूषा करून फिरू नये, अशी चित्रा वाघांची भूमिका आहे.
Urfi Javed: ‘एवढंच बोलते की, माझा नंगानाच चालूच राहील…’, उर्फी बरळली
चित्रा वाघांच्या नेमक्या आक्षेपालाच उर्फीने उत्तर दिलंय. उर्फीने पोलिसांना दिलेल्या उत्तरानुसार आपण शुटिंगसाठीच अशी वेशभूषा करतो आणि पापाराझी ते वेगवेगळ्या ठिकाणी शोधून आपले फोटो काढतात आणि व्हायरल करतात, असं उर्फीचं म्हणणं आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ नेमकी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT