Nagpur मध्ये अल्पवयीन मुलीवर दोनदा सामूहिक बलात्कार, चार आरोपी अटकेत
योगेश पांडे, नागपूर नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीतून दोन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना 29 जुलैच्या रात्री घडली असून याबाबतची माहिती समोर येताच पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ऑटो चालकासह चार आरोपींना अटक केलेली आहे. प्रकरणातील पीडिता ही […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीतून दोन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना 29 जुलैच्या रात्री घडली असून याबाबतची माहिती समोर येताच पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ऑटो चालकासह चार आरोपींना अटक केलेली आहे. प्रकरणातील पीडिता ही 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी असून ती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.
हे वाचलं का?
घरामध्ये भांडण झाल्याने 29 जुलैच्या रात्री ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर एका ऑटो चालकास तिने सीताबर्डी येथे सोडण्यास सांगितले. पण त्याच ऑटो चालकाने तिला आपल्या अन्य सहकाऱ्यांसह शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर ऑटो चालकाने पीडित युवतीला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नेऊन सोडून दिले.
रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गस्तीवर असणार्या रेल्वे पोलिसांना पीडित युवती दिसल्यावर तिने घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली.
ADVERTISEMENT
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर शहर सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने ऑटो चालकासह चार आरोपीना या प्रकरणात अटक केली असून सीताबर्डी पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
ADVERTISEMENT
Shocking! साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार
दरम्यान, नागपूरसारख्या शहरात अशी घटना घडल्याने सध्या एकच खळबळ माजली आहे. पण याशिवाय नागपूर पोलिसांवर देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी नागपूर पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागणार आहेत.
नागपूरमध्ये मागील काही वर्षापासून सातत्याने गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचं दिसतं आहे. मागील काही वर्ष गृहमंत्री हे नागपूरचेच होते. मात्र, असं असलं तरीही येथील गुन्हेगारी कमी झालेली दिसून आली नाही. किंबहुना यामध्ये वाढच होत असल्याचं सातत्याने पाहायला मिळालं आहे.
अशावेळी आता नागपूरच्या शहरी भागात सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिसांनी काही तासांच्या आता गुन्हेगारांना अटक केली आहे. मात्र, अशा स्वरुपाच्या घटनांना आळा कसा घालता येईल यासाठी नागपूर पोलिसांना आता प्रयत्न करावे लागतील. नागपूर पोलिसांना येथील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी नव्याने मोहीम देखील हाती घ्यावी लागणार आहे. तरच अशा प्रकारच्या घटनांना आळा बसू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT