परळी औष्णिक वीज केंद्राजवळच स्फोट घडवण्याचा कट; स्फोटक साहित्यासह दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून स्फोट करण्याचे साहित्य मोठ्याप्रमाणात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून वीजनिर्मिती केंद्राला आणि केंद्रात येणाऱ्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला […]
ADVERTISEMENT

अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून स्फोट करण्याचे साहित्य मोठ्याप्रमाणात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून वीजनिर्मिती केंद्राला आणि केंद्रात येणाऱ्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिलेटीनच्या 103 कांड्या, 150 तोटे, बॅटरी, वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त
वीज निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेचा उपसा राख माफियाकडुन मोठ्याप्रमाणात होत असल्याचं मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहे. औष्णीक वीज निर्मिती केंद्राजवळच स्फोट करुन राख उपसली जात होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास असाच स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले, त्यापैकी एकजण फरार झाला आहे. आरोपी विरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात भादवी 286,स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे, बॅटरी, वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
मराठवाड्यातील एकमेव परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. परंतु गत दोन वर्षापासून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतुक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचं दिसून येत आहे.
स्फोट करून राख जमा केली जात होती
थर्मलची राख ज्या ठिकाणी पडत होती ती राख तळ्यात साचत असते. ती राख खड्ड्यात पडली पाहिजे यामुळे संबंधित आरोपींनी होल घेऊन ब्लास्ट केला. मात्र वीजनिर्मिती प्रकल्पाच्या परिसरात अशा पद्धतीने स्फोट करण्यास मनाई आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी मुंबई तकला दिलीय.