भाजपने शिवसेनेतल्या डरपोक गटाला ‘मिंधे’ बनवून सत्तेची हाडकं टाकली, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन. या निमित्ताने सामनात आलेल्या अग्रलेखात शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. भाजपने जे केलं तो बदला नाही तर राष्ट्रद्रोह होता असंही यात म्हटलं गेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात ढोंगाला स्थान दिलं नाही असंही यात म्हटलं गेलं आहे.महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री चाळीस बेईमान […]
ADVERTISEMENT
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन. या निमित्ताने सामनात आलेल्या अग्रलेखात शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. भाजपने जे केलं तो बदला नाही तर राष्ट्रद्रोह होता असंही यात म्हटलं गेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात ढोंगाला स्थान दिलं नाही असंही यात म्हटलं गेलं आहे.महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री चाळीस बेईमान खंजिरांसह शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आजही महाराष्ट्र आणि देश भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतो आहे, हे ढोंग आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या जीवनात आणि आचरणात ढोंगाला कधीही स्थान दिलं नाही. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे. जगाच्या इतिहासातील अमर महापुरूषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे.
बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली
महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणे झाले होते. मराठी माणसांचा रामा गडी करून ठेवला होता. मोगलांनी आणि इंग्रजांनी जशी देशाची लूट केली तशी मुंबईसह महाराष्ट्राची लूट सुरू होती. त्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली. संपूर्ण महाराष्ट्र त्या विचारांनी उजळून निघाला. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रकार कमी झाले का? मात्र सगळ्यांना शिवसेना पुरून उरली आहे. आता मात्र हा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल.
हे वाचलं का?
भाजपने राष्ट्रद्रोह केला
भाजपने बदला घ्यायच्या म्हणून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फोडली. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. अर्थात हा बदला नसून राष्ट्रद्रोह आहे. शिवसेना ही प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रीय बाण्यासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते आणि आजही आहेत. त्या संघटनेच्या पाठीत चाळीस खंजीर खुपसून भाजपने राष्ट्रद्रोहच केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून बदला घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्राच्या मातीचा माणूस म्हणता येणार नाही.
शिवसेनेतल्या एका डरपोक गटास आपले लाचार आणि मिंधे बनवून त्या गटासमोर सत्तेची हाडकं टाकण्यात आली. हा कुणाला बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची ११ कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT