‘तेव्हा मोदींनी ऐकलं का?’; उद्धव ठाकरे ‘भारत जोडो’वरून केंद्रावर भडकले
चीनसह जगभरातील अनेक देशांत नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा हैदोस घातला आहे. त्यामुळे भारतातही सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनावरून चिंता व्यक्त होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना एक पत्र पाठवलं आणि कोरोना नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं अथवा भारत जोडो यात्रा स्थगित करावी, असं सांगितलं. केंद्रीय मंत्र्यांच्या याच पत्रावरून […]
ADVERTISEMENT

चीनसह जगभरातील अनेक देशांत नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा हैदोस घातला आहे. त्यामुळे भारतातही सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनावरून चिंता व्यक्त होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना एक पत्र पाठवलं आणि कोरोना नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं अथवा भारत जोडो यात्रा स्थगित करावी, असं सांगितलं. केंद्रीय मंत्र्यांच्या याच पत्रावरून उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भूमिका मांडलीये.
राहुल गांधींना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी पत्र पाठवल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि सामना संपादक उद्धव ठाकरेंनीही यावरून केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत.
भारत जोडो यात्रा रोखता येत नसल्यानं कोरोनाचं कारण…?
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला रोखता येत नसल्यानं केंद्राने कोरोनाचं निमित्त पुढे केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंनी केलाय. सामना अग्रलेखात म्हटलंय की, “चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्यानं वाढू लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा गुंडाळावी, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सुचवलं आहे.”
संजय राऊतांना मोठा धक्का; सावली सारखे सोबत असणारे भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात










