‘ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण…’, ठाकरेंनी मानले पवारांचे आभार, राज ठाकरेंबद्दल मौन
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशीच भूमिका मांडली. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी फक्त शरद पवारांचेच आभार मानलेत. […]
ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशीच भूमिका मांडली. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी फक्त शरद पवारांचेच आभार मानलेत.
राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यांनी एका पत्राद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट करताना ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या भूमिकेची चर्चा होत असतानाच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक ते दीड वर्षांचा कालावधी राहिला असून, निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केलं.
दोन नेत्यांच्या भूमिकांनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका समोर आलीये. मात्र त्यांनी फक्त शरद पवारांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलंय.
‘…तर मी काही बोललो नसतो’; गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत शरद पवार अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काय बोलले?