उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. कोर्लई गावात हे बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. अशात आज किरीट सोमय्या हे कोर्लई गावाला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना राडाही करू शकतं. मात्र आज किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धवजी जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

कोर्लई गावातले 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावावर आहेत का? सरपंच उत्तर देत म्हणाले…

आणखी काय म्हणाले आहेत सोमय्या?

हे वाचलं का?

गेल्या 17 महिन्यांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहोत. मला त्या ग्रामपंचायतीनंच माहिती दिली आहे. त्यांनी जी कागदं दिली आहेत त्यावरुनच आम्ही बोलत आहोत. आम्हाला वास्तविकता काय झालं हे समजून घ्यायचं आहे. काय झालंय हे आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच सांगावं. ते खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात. फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

मुलुंडच्या ‘त्या’ दलालाला जोड्याने मारू; संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, प्रशासनानं आम्हाला अडवलं तर आम्ही काहीही विरोध करणार नाहीत पण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अडवत असतील तर मात्र काय होईल हे सांगू शकत नाही. 19 बंगले ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. जर हे बंगले त्यांचे असतील तर ते त्यांच्या संपत्तीमध्ये का दाखवण्यात आले नाहीत. मला कोर्लईमध्ये आधीही गेलो होतो त्यावेळीही तिथल्या सरपंचांनी विरोध केला होता. हे खरं आहे की नाही याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवारानं द्यायचं आहे. घरं चोरीला गेली की गायब झाली हे ठाकरे परिवारानं सांगायचं आहे. जनतेला त्यांनी सत्य सांगावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार?-किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावाला भेट देणार आहेत. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे ते समजलं पाहिजे. कोर्लई गावातल्या ज्या सरपंचांनीच मंजुरी दिली आहे. जानेवारी 2019 ला ग्रामपंचायतच्या सभेत रश्मी ठाकरेंनी अर्ज केला होता. मी 2014 मध्ये जो करार नोंदणी केला ती जमीन अन्वय नाईक यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेतल्या. ताडाची झाडं, माडाची झाडं, विहिरी हे सगळं माझं आहे. जमीन माझ्या नावावर झाली आहे मात्र घरंही माझ्या नावावर झाली पाहिजेत असं या अर्जात रश्मी ठाकरेंनी म्हटलं होतं. मे 2019 च्या सभेत सरपंचांनी प्रस्तावा पारित केला. त्यात सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावे करावीत. जून 2019 ला प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर ही घरं त्यांच्या नावावर करण्यात आली. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तीगत संबंध मी नोव्हेंबर 2020 मध्ये समोर आणली होती. सगळे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याच्या रितसर पावत्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमकं सत्य काय त्याची पाहणी मी आज जाऊन करणार आहे असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT